चाहत्यांना आता पाहावी लागणार वाट! रोहित-विराट मैदानात कधी परतणार?
विराट कोहली (Virat Kohli & Rohit Sharma) आणि रोहित शर्मा यांना क्रिकेटच्या मैदानावर पाहण्यासाठी चाहत्यांना आता मोठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. पुढच्या महिन्याच्या 7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये रोहित खेळणार नाही, असे पहिल्यांदाच घडणार आहे.
रोहित आणि कोहलीने टी-20 आणि कसोटीतून निवृत्ती घेतली असून, ते आता भारतासाठी फक्त वनडे (ODI) फॉरमॅटमध्ये खेळतात. न्यूझीलंडविरुद्धची वनडे मालिका संपल्यानंतर विराट कोहली पुन्हा इंग्लंडला रवाना झाला आहे. इंदोरमधील सामन्यात पराभव झाल्यामुळे टीम इंडियाने मालिका गमावली असली, तरी कोहलीच्या शतकी खेळीने चाहत्यांचे भरपूर मनोरंजन केले. दुसरीकडे, या मालिकेत रोहित शर्माची बॅट शांत राहिली. तिन्ही डावांत मिळूनही त्याला 100 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. तरीही, हे दोन्ही दिग्गज मैदानात असल्याने चाहत्यांमध्ये मोठा उत्साह होता.
भारताच्या पुढच्या वनडे मालिकेत तर हे दोघे खेळतीलच, पण त्याआधीही चाहते त्यांना मैदानात पाहू शकतील. इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये हे दोन्ही दिग्गज खेळताना दिसतील. रोहित शर्मा मुंबई इंडियन्ससाठी खेळतो ज्या संघाला त्याने 5 वेळा चॅम्पियन बनवले आहे, सध्या हार्दिक कर्णधार आहे. तर विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी (RCB) खेळतो, ज्या संघाने गेल्या हंगामात आपले पहिले आयपीएल विजेतेपद पटकावले आहे.
भारतीय संघाच्या ज्या वनडे मालिकेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे, ती जुलैमध्ये इंग्लंडविरुद्ध होणार आहे. परंतु, त्याआधी जूनमध्ये भारत अफगाणिस्तानविरुद्ध घरच्या मैदानावर वनडे मालिका खेळणार आहे. अफगाणिस्तान मालिकेचे अधिकृत वेळापत्रक अद्याप आलेले नाही, मात्र कोहली आणि रोहित जूनमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसतील.
Comments are closed.