टी20 वर्ल्ड कप 2026 साठी ब्रँड अँम्बेसेडर बनलेल्या रोहित शर्माला किती मानधन मिळणार? जाणून घ्या सविस्तर
रोहित शर्माला 2026 टी20 वर्ल्ड कपचा ब्रँड अँम्बेसेडर (Rohit Sharma brand ambassador of T20 World Cup 2026) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. ICC चेअरमन जय शाह (Jay Shah) यांनी स्वतः ही माहिती दिली आहे की, रोहित शर्मा वर्ल्ड कपचा ब्रँड अँम्बेसेडर असेल. पुढील वर्षी हा वर्ल्ड कप 7 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान खेळवला जाणार असून, जगभरातील 20 संघ यात सहभागी होतील.
ब्रँड अँम्बेसेडर म्हणून रोहित शर्मा विविध शहरांमध्ये, मैदानांवर आणि कार्यक्रमांमध्ये जाऊन टी20 वर्ल्ड कपचे प्रमोशन करेल. आता प्रश्न असा आहे की, या कामासाठी रोहित शर्माला काही पगार किंवा मानधन मिळणार का? टी20 वर्ल्ड कपसाठी नियुक्त केलेल्या ब्रँड अँम्बेसेडर किती मानधन दिले जाते, याची माहिती साधारणपणे सार्वजनिक केली जात नाही. त्यांच्या पगाराची रक्कम त्यांच्या ब्रँड व्हॅल्यू, मार्केट रेट किंवा ते सामान्यतः एखादे जाहिरात करार करताना जितके घेतात, त्यावर ठरते. पगाराचे हे सगळे तपशील ICC आणि त्या खेळाडू यांच्यातील गोपनीय कराराचा भाग असतो.
रोहित शर्माबद्दल बोलायचे झाले, तर मीडिया रिपोर्टनुसार तो एका जाहिरात करारासाठी 3.5 ते 7 कोटी रुपये घेतो. मात्र, वर्ल्ड कपचा ब्रँड अँम्बेसेडर बनल्यानंतर त्याला नेमकी याच रकमेची मिळकत होईल असे नाही. पण या अंदाजावरून त्याला एखादी ठराविक रक्कम दिली जाऊ शकते.
2024 टी20 वर्ल्ड कप वेळी युवराज सिंह, शाहिद आफ्रिदी, ख्रिस गेल यांसारख्या दिग्गजांना ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्यात आले होते.
या सर्वांना किती पैसे मिळाले किंवा मिळालेच नाहीत, याची माहिती ICC ने त्या वेळीही जाहीर केली नव्हती.
Comments are closed.