4 वर्षांपूर्वी ओव्हलवर भारताचा जलवा! रोहितचं शतक, विराट-शार्दुलची फिफ्टी, इंग्लंड आजही घाबरतंय
भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटचा कसोटी सामना 31 जुलैपासून ओव्हलच्या मैदानावर खेळला जाणार आहे. या लढतीसाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. मात्र भारताला या सामन्यात जसप्रीत बुमराहशिवाय उतरावे लागणार आहे. विशेष म्हणजे, ओव्हलवर जेव्हा शेवटचा सामना दोन्ही संघांमध्ये झाला होता, तेव्हा भारताने इंग्लंडवर 157 धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. चला पाहूया त्या संस्मरणीय लढतीत कोणाचा कस होता.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने चौथ्या कसोटी सामन्यात (IND vs ENG 4th Test) इंग्लंडला पाचव्या आणि अखेरच्या दिवशी 157 धावांनी पराभूत केले होते. भारताची पहिली डाव कोहली आणि शार्दुल ठाकूर यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 191 धावांवर संपली होती. प्रत्युत्तरात इंग्लंडने 290 धावा करून 99 धावांची आघाडी घेतली होती.
यानंतर दुसऱ्या डावात भारतासाठी रोहित शर्मा चमकला. त्याने शानदार शतक (127 धावा) झळकावून टीम इंडियाला 466 धावांचा डोंगर उभारून दिला. इंग्लंडसमोर विजयासाठी 368 धावांचे आव्हान ठेवण्यात आले. शेवटच्या दिवसाच्या पहिल्या सत्रात इंग्लंडने दोन गडी गमावत 131 धावा केल्या होत्या.
लंचनंतर मात्र भारतीय गोलंदाजांनी खेळाचा पट बदलून टाकला. काही वेळातच इंग्लंडचे सलग 4 गडी माघारी धाडले गेले आणि स्कोअर 6 बाद 147 झाला. रवींद्र जडेजाने सलामीवीर हसीब हमीद (63) ला बाद करून मोठी चाल खेळली. हमीदने 193 चेंडूत 63 धावा केल्या. अखेरीस इंग्लंडचा डाव 210 धावांवर आटोपला. आशाप्रकारे भारताने ओव्हलवर संस्मरणीय विजय मिळवला.
Comments are closed.