रोहित जैन आरबीआयचे नवे डेप्युटी गव्हर्नर
सरकारने रोहित जैन यांची रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती केली आहे. जैन हे एम. राजेश्वर राव यांची जागा घेतील. त्यांचा कार्यकाळ हा तीन वर्षांचा असेल. तसेच पुढील आदेश येईपर्यंत ते या पदावर कार्यरत असतील. सध्या रोहित जैन हे आरबीआयमध्ये कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत होते. याआधी त्यांनी देखरेख, अंमलबजावणी आणि जोखीम व्यवस्थापन यासारख्या महत्त्वाच्या विभागांचे नेतृत्व केले आहे. गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या नेतृत्वाखाली एपूण चार डेप्युटी गव्हर्नर आहेत.
Comments are closed.