जिथं पक्ष कुमकुवत तिथं जयंत पाटलांनी गेलच पाहिजे, पुन्हा आपली सत्ता आणण्याची गरज : रोहित पाटील
रोहित पाटील: आपल्यासह मित्र पक्षांचे सदस्य कमी असले तरी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या नेतृत्वात आपली सत्ता निश्चित येईल असा विश्वास आमदार रोहित पाटील यांनी व्यक्त केला. सांगलीत आयोजीत केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या मेळाव्यात रोहित पाटील (Rohit Patil) बोलत होते. अनेक मुंग्या मिळून नागाला जसं पळवून लावू शकतात तसेच राज्यात पुन्हा आपली सत्ता आणण्याची गरज असल्याचे रोहित पवार म्हणाले.
ज्या ठिकाणी आपला पक्ष कमकुवत आहे त्या ठिकाणी जयंत पाटील यांना गेलेच पाहिजे
तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातील 69 पैकी 60 ग्रामपंचायतीमध्ये सत्ता आम्ही खेचून आणली आहे असे रोहित पाटील म्हणाले. अनेक मुंग्या मिळून नागाला जसं पळवून लावू शकतात तसेच राज्यात पुन्हा आपली सत्ता आणण्याची गरज आहे. आगामी काळात निवडणुका जिंकण्यासाठी जयंत पाटील यांना जिल्ह्यातच कसं राहता येईल हा आग्रह करता कामा नये. ज्या ठिकाणी आपला पक्ष कमकुवत आहे त्या ठिकाणी जयंत पाटील यांना गेलेच पाहिजे असे रोहित पाटील म्हणाले. एखाद्या नगरपंचायतीची किंवा महानगरपालिकेची शहरापूर्वी निवडणूक नाही तर संपूर्ण राज्याची निवडणूक असणार आहे. आजपर्यंतच्या निवडणुकीत पहिल्यांदाच आता सांगलीला महत्व दिलं जात नसल्याचं दिसून येत असल्याचे पाटील म्हणाले.
पक्ष उभा करण्यासाठी आपण पुन्हा एकत्र येण्याची गरज
सांगली जिल्ह्याला आता अजिबात महत्व नाही असे रोहित पाटील म्हणाले. कोणतेही काम करताना नेत्याने कमीपणा घेण्याची गरज नाही. पक्ष उभा करण्यासाठी आपण पुन्हा एकत्र येण्याची गरज असल्याचे रोहित पाटील म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीयअध्यक्ष खासदार शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार पहिली बैठक आज सांगलीत पार पडत आहे. या बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थितीत आहेत. मागे झालेल्या बैठकीत हर्षवर्धन पाटील आणि आमदार शशिकांत शिंदे हे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी म्हणून निवडलेले गेले होते. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीनं ही बैठक महत्वाची मानली जात आहे, विधानसभा निवड़णुकीत पक्षाला आलेलं अपयश तसचे पक्षात पडलेली फूट या दृष्टीनं ही बैठक महत्वाची मानली जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
Dance Bar : महाराष्ट्राची संस्कृती वाचवण्यासाठी मैदानात उतरू, डान्सबार विरोधात आर आर आबांच्या लेकाचा सरकारला इशारा
अधिक पाहा..
Comments are closed.