पाणी-स्वच्छतागृहे सरकारने बंद केली, मराठा आंदोलकांची गळचेपी; रोहित पवारांचा आरोप

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातून मुंबईत आलेल्या मराठा बांधवांची गळचेपी सुरू केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवरील पोस्टच्या माध्यमातून आज केला.
पोस्टमध्ये काय म्हटले…
मुंबई शहरातील पाणपोया बंद, रेल्वे स्थानकावरील तसेच इतर सार्वजनिक ठिकाणावरील स्वच्छतागृहांना काही ठिकाणी टाळे लावण्यात आले आहे. पिण्याचे पाणीदेखील उपलब्ध करून दिले जात नाही. सामाजिक संघटनांतर्फे पाठवण्यात येत असलेली मदतदेखील ब्लॉक करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे समजत आहे. खाऊगल्ल्या, टपऱया हॉटेल्सदेखील बंद ठेवण्याचे अलिखित आदेश आहेत. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आंदोलक माणसं आहेत याचा सरकारला विसर पडला काय, असा सवाल रोहित पवार यांनी या पोस्टमधून केला आहे.
- सरकारने आंदोलकांशी संवाद सुरू ठेवावा. संवेदनशीलता दाखवल्यास आंदोलकदेखील सकारात्मक प्रतिसाद देतील आणि तोडगा निघेल, असे रोहित पवार म्हणाले. रोहित पवारांच्या आरोपानंतर आक्रमक झालेल्या जरांगे यांनी, ‘बीएमसीचा तो आयुक्त कोण आहे त्याचे नाव लिहून ठेवा,’ असा इशारा दिला.
Comments are closed.