अजितदादांचे महत्त्व कमी करण्यासाठी त्यांच्याच पक्षातील नेत्यांची भाजपला साथ, रोहित पवार यांचा आरोप

महायुतीत अजितदादांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. त्यासाठी अजितदादा गटातील एक विदर्भातील आणि एक कोकणातील नेता भाजपला साथ देत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
भाजप अॅनाकाsंडासारखा दुसऱ्या पक्षाला गिळतो आणि डायजस्ट करून पुढे कुणाला फेकून देतं हे कधीच कुणाला
समजत नाही. अजितदादा आणि शिंदे गटाचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न महायुतीत सुरू आहे. अजितदादांच्या पक्षातील दोन नेते एक विदर्भातील आणि एक कोकणातील भाजपला मदत करत आहेत, असे रोहित पवार एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले.
राज्याचा मुख्यमंत्री बनण्याची क्षमता अजितदादांकडे होती, पण ती आता पुठे दिसत नाही. कारण भाजपच त्यांची ताकद हळूहळू कमी करत आहे. ज्या लोकांना अजितदादांनी सोबत नेले तेच आता त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही रोहित पवार म्हणाले.
भाजपच्या कुबद्यांचे काय होणार
अमित शहा म्हणतात, आम्हाला कुबडय़ांची गरज नाही. या कुबड्या म्हणजे कोण, अजितदादा गट आणि शिंदे गट आहे. या कुबड्या टांगल्या जातील की वाळत घातल्या जातील हे 2029 पर्यंत बघावे लागेल, असा टोला रोहित पवार यांनी महायुतीच्या घटक पक्षांना लगावला.

Comments are closed.