… तर न्यायव्यवस्थेवरील सामान्यांच्या विश्वासालाच तडा जाऊ शकतो, रोहित पवार यांनी व्यक्त केली चिंता

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याच्या सुनावणीपासून न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांनी दूर व्हावे, अशी मागणी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उच्च न्यायालयात केली आहे. ‘न्यायमूर्ती शर्मा या चार वेळा आरएसएसशी संबंधित संघटनेच्या कार्यक्रमाला हजर होत्या. त्या विशिष्ट विचारधारेशी संबंधित आहेत’, असा युक्तीवाद अरविंद केजरीवाल यांनी न्यायालयात केला. या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी X वरून आपले मत मांडले आहे.

”सरकार किंवा प्रशासनाकडून न्याय मिळत नाही तेव्हा प्रत्येकाची शेवटची आशा न्यायपालिका असते आणि न्यायपालिका कुठल्याही पूर्वग्रहशिवाय न्याय देईल ही सर्वसामान्य भावना असते. परंतु न्यायपालिका पूर्वग्रहाने काम करायला लागल्यास न्यायव्यवस्थेवरचा सर्वसामान्यांचा विश्वास उडू शकतो”, असे रोहित पवार यांनी ट्विट केले आहे.

”दिल्ली उच्च न्यायालयात ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांच्या केससंदर्भात आलेला याच प्रकारचा विषय चिंताजनक आहे. काही महिन्यांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयात देखील अशाच प्रकारचा विषय आम्ही समोर आणला होता, परंतु दुर्दैवाने त्याकडे दुर्लक्ष केले गेले. न्यायव्यवस्थेवर सर्वांचा ठाम विश्वास आहे, परंतु unbiasness हा या विश्वासाचा आधार आहे आणि हा आधारच डळमळीत असेल तर या विश्वासालाच तडा जाऊ शकतो”, अशी चिंता रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.

Comments are closed.