अंमलबजावणीबाबत मात्र दुष्काळ, शेतकरी योजनांबाबत रोहित पवार यांची टीका

शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची खैरात करणाऱ्या सरकारला या योजनांसाठी निधीची तरतूदही करता आली नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली.तसेच निवडणुकीच्यावेळी सरकारकडं शेतकऱ्यांसाठीच्या योजनांच्या घोषणांचा सुकाळ असतो पण अंमलबजावणीबाबत मात्र दुष्काळ असेही रोहित पवार म्हणाले.
एक्सवर पोस्ट करून रोहित पवार म्हणाले की, 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा सरकारने राणा भिमदेवी थाटात केली होती. आज 202५ साल संपत आलं तरी शेतकऱ्यांचं उत्पन्न काही दुप्पट झालं नाही पण सोयाबीन, कापूस, तूर आदी प्रमुख मालाला हमीभाव मिळणंही कठीण झालं. अशातच शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची खैरात करणाऱ्या सरकारला या योजनांसाठी निधीची तरतूदही करता आली नाही. त्यामुळं या योजनांसाठी गेल्या चार वर्षात अर्ज केलेल्या 56.17 लाख शेतकऱ्यांपैकी 38 लाखांपेक्षाही अधिक शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ हे सरकार देऊ शकलं नाही. केवळ 18.46 लाख शेतकऱ्यांनाच योजनांचा लाभ दिला, पण त्यांतील अनेकांचं अनुदान अद्याप मिळालेलं नाही. यावरुन निवडणुकीच्यावेळी सरकारकडं शेतकऱ्यांसाठीच्या योजनांच्या घोषणांचा सुकाळ असतो पण अंमलबजावणीबाबत मात्र दुष्काळ असल्याचं स्पष्ट होतं.
माझी सरकारला विनंती आहे की, मतांसाठी शेतकऱ्यांना न झुलवता अर्ज केलेल्या सर्व शेतकऱ्यांना हव्या असलेल्या योजनांचा लाभ द्यावा, अन्यथा या आकडेवारीच्या निमित्ताने सरकारचं पितळ उघडं पडलंच आहे, त्यामुळं या निवडणुकीत हेच शेतकरी सरकारला राजकीय दुष्काळात पाठवल्याशिवाय राहणार नाहीत असेही रोहित पवार म्हणाले.
२०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा सरकारने राणा भिमदेवी थाटात केली होती. आज २०२५ साल संपत आलं तरी शेतकऱ्यांचं उत्पन्न काही दुप्पट झालं नाही पण सोयाबीन, कापूस, तूर आदी प्रमुख मालाला हमीभाव मिळणंही कठीण झालं. अशातच शेतकऱ्यांसाठी विविध याजनांची खैरात करणाऱ्या… pic.twitter.com/gYVXfPvXTk
– रोहित पवार (@RRPSpeaks) 20 डिसेंबर 2025

Comments are closed.