महायुतीच्या 15 दिवसाचा सात बारा, रोहित पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी
महायुतीचे सरकार स्थापन होऊन 15 दिवसही झाले नाही. त्यात बीड आणि परभणी सारखी घटना घडली, काँग्रेस कार्यालयावर हल्ला झाला, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारचा सात बारा मांडला आहे.
एक्सवर पोस्ट करून रोहित पवार म्हणाले की,
१) परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा संशयास्पद मृत्यू…
२) बीडमध्ये सरपंचाची निर्घृण हत्या…
३) नांदेडमधील शिवसेना ठाकरे गटाच्या शहर प्रमुखाचे अपहरण..
४) कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला बेदम मारहाण..
५) कल्याणमध्येच चिमुरडीशी अश्लील चाळे करणाऱ्यास जाब विचारला म्हणून मराठी कुटुंबाला मारहाण..
६) पुण्यात लोहगाव परिसरात कोयता गँगचा हौदोस रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांवर कोयत्यानं वार करत माजवली दहशत..
७) छत्रपती संभाजीनगरमध्ये २ कंत्राटी कर्मचाऱ्यांनी इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून विभागीय क्रीडा संकुल प्रशासनाला २१.५९ कोटी रुपयांना घातला गंडा.
८) मुंबईत काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर हल्ला करून तोडफोड..
९) जमिनीच्या वादातून बार्शी तालुक्यात पुतण्याने चुलती आणि चुलत भावाचा केला खून..
नवीन सरकारच्या काळात अवघ्या १५ दिवसांत महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेचा हा आहे ७/१२. महाराष्ट्राला आता जीव मुठीत घेऊनच गप गुमानं फक्त जे घडतंय ते बघत रहावं लागणार आहे का? असा सवाल रोहित पवार यांनी विचारला आहे.
तसेच या गुन्हेगारीला चिरडण्यासाठी पोलीस यंत्रणेला अधिक बळ आणि फ्री हॅण्ड देण्याची आवश्यकता आहे, पण स्वतःच कायदा हाती घेणाऱ्या पोलीस यंत्रणेवरही नियंत्रण आणण्याची गरज आहे. मुख्यमंत्री महोदय याची योग्य दखल घेतील, अशी अपेक्षाही पवार यांनी व्यक्त केली आहे.
१) परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा संशयास्पद मृत्यू…
२) बीडमध्ये सरपंचाची निर्घृण हत्या…
३) नांदेडमधील शिवसेना ठाकरे गटाच्या शहर प्रमुखाचे अपहरण..
४) कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला बेदम मारहाण..
५) कल्याणमध्येच चिमुरडीशी अश्लील चाळे करणाऱ्यास जाब विचारला म्हणून मराठी कुटुंबाला…– रोहित पवार (@RRPSpeaks) 25 डिसेंबर 2024
Comments are closed.