सरकारच्या ढोंगीपणावर शिक्कामोर्तब, शेतकऱ्यांना जाहीर झालेल्या मदतीवर रोहित पवार यांची टीका

सरकारने शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत केली असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केले. तसेच यावरून सरकारच्या ढोंगीपणावर शिक्कामोर्तब झाले आहे अशी टीकाही रोहित पवार यांनी केली.
एक्सवर पोस्ट करून रोहित पवार म्हणाले की, शासनाचा कालचा मदतीचा जीआर बघितला असता, 21 लाख शेतकऱ्यांना 1310 कोटी म्हणजे एका शेतकऱ्याला 6221 रु. मदत, एवढ्या तुटपुंज्या मदतीत काय होणार आहे? लाखोंचे नुकसान आणि सरकारची 5-6 हजाराची मदत, हे या अलिशान सरकारला शोभते का ? राज्य सरकारने घोषित केलेले मदतीचे पॅकेज फसवे असल्याचं आम्ही आधीच सांगत होतो, आता सरकारच्या कालच्या जीआरने सरकारच्या ढोंगीपणावर शिक्कामोर्तबच केले आहे…
शासनाचा कालचा मदतीचा जीआर बघितला असता, २१ लाख शेतकऱ्यांना १३१० कोटी म्हणजे एका शेतकऱ्याला ६२२१ रु. मदत, एवढ्या तुटपुंज्या मदतीत काय होणार आहे?
लाखोंचे नुकसान आणि सरकारची ५-६ हजाराची मदत, हे या अलिशान सरकारला शोभते का ? राज्य सरकारने घोषित केलेले मदतीचे पॅकेज फसवे असल्याचं आम्ही… pic.twitter.com/R7q6VIt9gf
– रोहित पवार (@RRPSpeaks) 17 ऑक्टोबर 2025
Comments are closed.