ही तर संविधानाची चिरफाड, नितेश राणे यांच्या विधानावर रोहित पवार यांची टीका
![Rohit Pawar](https://marathi.tezzbuzz.com/wp-content/uploads/2025/02/Rohit-Pawar-696x447.jpg)
महाविकास आघाडीच्या सरपंचांना निधी मिळणार नाही असे विधान भाजप नेते नितेश राणे यांनी केले होते. ही तर संविधानाची चिरफाड आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नितेश राणेंना समज देतील का असेही रोहित पवार म्हणाले.
“जिल्हा नियोजनचा निधी किंवा कुठलाही निधी केवळ महायुतीच्या कार्यकर्त्यांनाच भेटेल बाकी कोणालाही भेटणार नाही, जिथे जिथे विरोधी पक्षाचे सरपंच असतील त्या गावाला एक रुपयाही देणार नाही, ज्यांना निधी हवा असेल त्यांनी पक्षप्रवेश करावा,” ही मंत्रीमहोदयांची भाषा बघता, त्यांनी मंत्रीपदाची… pic.twitter.com/9L8Q2VH8ML
– रोहित पवार (@rrpspeaks) 13 फेब्रुवारी, 2025
रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले आहे की, “जिल्हा नियोजनचा निधी किंवा कुठलाही निधी केवळ महायुतीच्या कार्यकर्त्यांनाच भेटेल बाकी कोणालाही भेटणार नाही, जिथे जिथे विरोधी पक्षाचे सरपंच असतील त्या गावाला एक रुपयाही देणार नाही, ज्यांना निधी हवा असेल त्यांनी पक्षप्रवेश करावा,” ही मंत्रीमहोदयांची भाषा बघता, त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेताना शपथेचा मजकूर काळजीपूर्वक वाचलेला दिसत नाही अथवा त्यांना संवैधानिक शपथेचा विसर पडलेला दिसतो.
तसेच मंत्रीच अशा प्रकारे संविधानाची चिरफाड करणार असतील तर संविधान टीकेला का? मंत्री महोदयांनी संवैधानिक जबाबदारी समजून घेत मंत्र्यांसारखे वागायला हवे. मुख्यमंत्री महोदय आपल्या मंत्र्यांना समाज देतील, ही अपेक्षा! असेही रोहित पवार म्हणाले.
Comments are closed.