संजय शिरसाठ यांच्या सहा तासांच्या दौऱ्यात अतिवृष्टीसाठी फक्त एक तास राखीव, रोहित पवार यांची टीका

मराठवाड्यात पुराने हाहाकार माजवला आहे. त्यात मिंधे गटाचे मंत्री संजय शिरसाट पाहणी दौऱ्यावर निघाले आहेत. सहा तासांच्या दौऱ्यात शिरसाट फक्त एक तास पाहणी करणार आहेत, तर बाकी पाच तास शिरसाट पक्ष संघटनेसाठी देणार आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यानी शिरसाट यांच्यावर टीका केली आहे. अशा ‘पर्यटन’ मंत्र्यांच्या दौऱ्यांची शेतकऱ्यांना कदापि गरज नाही असे रोहित पवार म्हणाले.
एक्सवर पोस्ट करून रोहित पवार म्हणाले की, सिडकोचे महापराक्रमी मंत्री शिरसाठ साहेबांचा हा अतिवृष्टी पाहणी दौरा बघा. यात अतिवृष्टीच्या पाहणीसाठी 1 तास आणि पक्ष संघटनेसाठी 6 तास राखीव आहेत. म्हणजेज शिरसाठ साहेब पक्ष संघटनेच्या बैठकीतून केवळ पाय मोकळा करण्यासाठी येणार आहेत का? ही शेतकऱ्यांची थट्टा नाही तर काय आहे?
हे मंत्री शेतकऱ्यांचे अश्रू पुसणार आहेत की त्याच्या जखमेवर मीठ चोळणार आहेत? अशा ‘पर्यटन’ मंत्र्यांच्या दौऱ्यांची शेतकऱ्यांना कदापि गरज नाही. अशा फालतू दौऱ्यापेक्षा सरकारने ओला_दुष्काळ जाहीर करावा, कर्जमाफी द्यावी आणि शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार मदत द्यावी अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.
Comments are closed.