निलेश राणेंचे भाजपवर आरोप, रोहित पवारांनी केलं अभिनंदन, म्हणाले, भाजपचे पाय चिखलाने माखलेले
रोहित पवार भाजपवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) ज्या ज्या वेळी जिह्यात येतात, तेव्हा वेगळं वातावरण करतात. मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरी 25 लाख रुपये मिळाल्यावरुन शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप केला आहे. यावरुन चांगेलच राजकीय वातानरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. आता याच मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी निलेश राणे यांचे अभिनंदन करत भापवर जोरदार प्रहार केला आहे.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
निवडणुका जिंकण्यासाठी वारेमाप पैशाचा वापर करणाऱ्या भाजपाचा खरा चेहरा पुराव्यासह उघड केल्याबद्दल शिवसेना नेते आमदार निलेश जी राणे यांचे मनापासून आभार! सत्तेत असताना मलिदा खायचा आणि नंतर त्याचाच वापर करुन निवडणुका जिंकायच्या हाच भाजपच्या विजयाचा ‘फॉर्म्युला’ आहे. यात कोणतीही चाणक्य नीती नाही. आता मित्रपक्षाच्याच आमदाराने टराटरा कपडे फाडल्याने ‘पार्टी विथ डिफरन्स’ असे नाकाने कांदे सोलण्याचे धंदे भाजपाने बंद करावेत आणि आपले पाय मातीतच नाही तर चिखलात पूर्ण माखलेले आहेत, हे मान्य करावं अशी टीका रोहित पवारांनी केलीय.
नेमकं प्रकरण काय?
मालवणमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांच्या घरी 25 लाख रुपयांची रोकड सापडली आहे. विजय किंजवडेकर असं त्यांच नाव आहे. त्यांच्या घरी हे पैसे काय करतात, हे सगळं निवडणूक यंत्रणेला सांगावे लागेल असे निलेश राणे म्हणाले. काल रवींद्र चव्हाण मालवण मध्ये येऊन गेले, कालपासूनच वेगाने पैसे वाटपाची पद्धत सुरू झाली आहे असे म्हणत राणे यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप केले. पैसे वाटप करुन निवडणूक लढवायची पद्धत आहे का?. मैदानात येऊन लढा. त्या घरात अजून पैशाच्या बॅग आहेत. त्या शोधून योग्य ती कारवाई करावी. 25 ते 50 लाख रुपये भरून ठेवलेली मालवण मध्ये 8 ते 10 घर असल्याचा निलेश राणेंनी आरोप केला आहे. वातावरण गढूळ करून शहराचा असा प्रकारे विकास करणार का?. उद्या निवडणूक आयोगाकडे आणि पोलिस कार्यालयात जाऊन काय कारवाई केली याचा आढावा घेणार. भाजपचे कार्यकर्ते कोण कोण पैसे वाटप करतात, याची यादी देणार. पप्पा तवटे, रुपेश कानडे, रणजीत देसाई, मोहन सावंत अंगावर पैसे घेऊन वाटत आहेत. रोज यांच्याकडे बॅग पोहोचवण्याची यंत्रणा तयार असल्याचा दावा देखील निलेश राणेंनी केला. भाजप जिंकली तर लोकांची सेवा करायला नगरपरिषदेत जाणार नाहीत, नगरपरिषदेत लुटायला जाणार असे राणे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरी मिळाले 25 लाख, निलेश राणेंचा रवींद्र चव्हाणांवर गंभीर आरोप, म्हणाले, भाजप जिंकली तर नगरपरिषद लुटणार
आणखी वाचा
Comments are closed.