सरकार दलालीच्या दलदलीत पोखरलंय! लाडकी बहिण योजनेत कोट्यावधींचा भ्रष्टाचार, रोहित पवारांची टीका

स्टॅट गव्हर्नमेंट लाडकी बहिणी योजना वर रोहित पवार: लाडकी बहिण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. लाडकी बहिण योजनेत कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय. लाडकी बहिण योजनेवर सरकार कोट्यावधी रुपयांचा खर्च करत असल्याचे रोहित पवार यांनी म्हटलं आहे. त्यांनी सरकारचा एक जीआर ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

नेमकं काय म्हणाले रोहित पवार?

हे सरकार दलालीच्या दलदलीत इतकं पोखरलं गेलंय की लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी दिलेली नाही. सरकार ‘लाडकी बहिण’ योजनेच्या जाहिरातींसाठी कोट्यवधी रुपये खर्च तर करत असून यातही मोठ्या प्रमाणात अपहार होत असल्याची चर्चा रोहित पवारांनी म्हटलं आहे. 15 ऑगस्ट 2024 रोजी सरकारने लाडकी बहिण योजनेच्या जाहिरातींसाठी 200 कोटी रुपये खर्चाचा जीआर काढला होता. तर 23  नोव्हेंबर 2023 रोजी सरकारच्या निर्णयात ज्या संस्थांची नावे आहेत, त्यांना ही कामे माहिती व जनसंपर्क विभागामार्फत देणे अपेक्षित होते, परंतु 5 फेब्रुवारी 2025 रोजी महिला व बालविकास विभागाने नवीन जीआर काढून लाडकी बहिण योजनेच्या जाहिरातीसाठी 3 कोटींची मान्यता दिली.

कंपन्या कोणत्या आणि कुणाच्या आणि कुणाशी संबंधित आहेत?

15ऑगस्ट 2024 रोजच्या जीआर मधील 200 कोटींच्या मर्यादेतीलच ही रक्कम असल्याचे या जीआर मध्ये नमूद असले तरी 23 नोव्हेंबर 2023 च्या जीआरमध्ये नमूद संस्थांना काम देण्याऐवजी हे काम इतर संस्थांना दिल्याची माहिती आहे. माहिती जनसंपर्क विभाग असताना महिला बालविकास विभागाने ही कामे का दिली? ज्या कंपन्यांना कामे देण्यात आली त्या कंपन्या कोणत्या आणि कुणाच्या आणि कुणाशी संबंधित आहेत? माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी या कंपन्यांची माहिती मागवली असता महिला बालविकास विभाग यासंदर्भातील माहिती का लपवत आहे? बोगस कंपन्यांना ही कामे देण्यात आली का? याचा खुलासा सरकारने करावा अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. तसेच आम्ही पुराव्याशिवाय आरोप करत नाहीत असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे. दरम्यान, लाडकी बहिण योजनेच्या मुद्यावरुन रोहित पवारांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांच्या या टीकेला सरकार काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसाठी 26.34 लाख महिला अपात्र, खात्यावर पैसे नाहीत, जून महिन्यातील आकडेवारी जाहीर

आणखी वाचा

Comments are closed.