सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनास्थळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भेट दिली. यावेळी, अभिजीत दीपकेंची भेट घेत त्यांनी आंदोलनास आपला पाठिंबा असल्याचेही जाहीर केले. तसेच, केंद्र सरकारवर टीका करताना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर देखील महाभियोग चालवावा, सरन्यायाधीशांना (CJI) पदच्युत करावे, अशी मागणी रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना केली. तसेच, विद्यार्थी, आंदोलकांवर पोलिसांकडून होत असलेल्या लाठीचार्जवरुनही रोहित पवार यांनी परखड भूमिका मांडली.
दिल्लीतील या सत्याग्रहाला देशभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे, हे आंदोलन समावेशक आहे. सिस्टिमच्या विरोधात हे आंदोलन दिसून येत आहे. नीट पेपर फुटल्यानंतर या सत्याग्रहाची सुरुवात झाली, या आंदोलनात मी पहिल्यांदाच जंतर मंतर येथे आलो. विद्यार्थी, पालक, माजी सैनिक असे अनेक लोक तिथे आले आहेत. सरकारवर दबाव निर्माण झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे, मी अभिजीत भाऊंना देखील भेटलो, असे रोहित पवार यांनी म्हटले.
सरन्यायाधीशांविरुद्ध महाभियोग चालवावा
आमचा सगळा विश्वास न्याय व्यवस्थेवर आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाचे CJI यांनी दिलेले स्टेटमेंट दुर्देवी होतं. सर्वोच्च न्यायालयाच्या पदावर विश्वास आहे, पण त्यावर बसलेल्या CJI वर आमचा विश्वास नाही, असे म्हणत रोहित पवार यांनी थेट सीजेआय यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. सुप्रीम कोर्टाच्या वक्तव्यामुळे ही शंका येते, मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना मंत्रिपदावरुन काढलं पाहिजे ही मागणी तर आहेच. पण, दुसरी मागणी राहुल गांधी यांच्याकडे करतो की, CJI लोकशाहीच्या विरोधात बोलत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर महाभियोगाची प्रक्रिया संसदेतून सुरू करावी, अशी विनंती असल्याचंही रोहित पवार यांनी म्हटलं.
पोलिसांच्या भूमिकेवरूनही सुनावलं
आंदोलनावेळी झालेल्या लाठीचार्जमदरम्यान 20 तारखेच्या आधी फोडलेल्या गाड्या तिथे आणल्या होत्या, त्या गाड्या येथील युवकांनी फोडल्या अस त्यांना दाखवायचं होत. आज किंवा उद्या हाच प्रयत्न केला जाऊ शकतो अशी भीती तिथे वाटतो. नेत्यांच्या बाजूने भूमिका घ्यायची, हे काम अंधभक्त करतात तुम्हाला बहिणी नाहीत का? असा सवाल उपस्थित करत महिलांवर, विद्यार्थींनीवर होत असलेल्या लाठीचार्ज आणि हल्ल्यावरुन पोलिसांवर देखील रोहित पवार यांनी निशाणा साधला.
हेही वाचा
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Comments are closed.