दलदलीची दलाली… महायुतीचे 11 घोटाळे, रोहित पवारांनी भ्रष्टाचाराची जंत्रीच मांडली
महायुती सरकारच्या घोटाळ्याचा पाढाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी विधान भवनाच्या आवारात मांडला. सरकार नव्हे, हे दलाल आहेत, ‘सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता’ असेच महायुती सरकारचे सूत्र असून दलालीच्या पैशातून महाराष्ट्राचा स्वाभिमान विकत घेण्याचे सरकारचे मनसुबे आहेत, असा जोरदार हल्ला त्यांनी चढवला. ‘दलालीची दलदल’ या पुस्तिकेच्या माध्यमातून त्यांनी सरकारचे 11 घोटाळे बाहेर काढले आहेत.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी रोहित पवार आक्रमक झाले. महायुती सरकारच्या काळातील घोटाळय़ांकडे लक्ष वेधण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
नव्या योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर भार पडल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. परंतु नव्या योजनांमुळे नव्हे, तर सत्ताधाऱयांनी दलाली खाल्ल्यामुळेच राज्याची तिजोरी रिकामी झाली असा आरोप रोहित पवार यांनी केला.
सरकार खोटारडे
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांनी घेतलेली पत्रकार परिषद म्हणजे गंमतजंमतच होती, अशी टीकाही रोहित पवार यांनी केली. नंबरप्लेटबाबत त्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला दावाही त्यांनी खोडून काढला. गुजरातमध्ये टू व्हीलरच्या नंबर प्लेटसाठी 150 रुपये घेतले जातात, पण महाराष्ट्रात त्याच नंबरप्लेटला 531 रुपये घेतले जात आहेत, असे त्यांनी निदर्शनास आणले.
सरकारला फसवूनही कृषिमंत्री मोकाट
माणिकराव कोकाटे यांनी सरकारला फसवले तरीही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, असे सांगत रोहित पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे उदाहरण दिले. राहुल गांधी यांची सिव्हिल केस होती तरीदेखील त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती आणि कोकाटे यांच्याविरुद्ध फौजदारी केस असूनही ते मोकाट आहेत असे ते म्हणाले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेचा जवळचा माणूस मास्टरमाइंड आहे, त्यामुळे त्यांचाही राजीनामा कधी घेताहेत त्याची वाट पाहतोय, असा चिमटाही त्यांनी काढला.
सत्ताधाऱ्यांनी गेल्या अडीच वर्षांत 50 हजार कोटींपेक्षा जास्त दलाली खाऊन महाराष्ट्राला दलालीच्या दलदलीत गाडले, ते घोटाळे आपण कागदपत्रांसह मांडले, परंतु सरकारने कारवाई केलेली नाही. – रोहित पवार
- रुग्णवाहिका घोटाळा
- आश्रमशल्ला दूध-मैल आहे
- सामाजिक न्याय
- विभाग भोजनपुरवठा घोटाळा
- एमएसआयडीसी घोटाळा
- कंत्राटी भरती घोटाळा
- एमआयडीसी जमीन
- आनंदाचा शिधा घोटाळा
- पुणे रिंग रोड घोटाळा
- समृद्धी महामार्ग घोटाळा
- एमएसआरडीसी घोटाळा
- रक्तपेढी परवानगी
Comments are closed.