Rohit Pawar expressed expectations from Finance Minister


यंदाच्या अर्थसंकल्पात प्राप्तिकर स्लॅब सुधारून किमान 10 लाख रुपये उत्पन्न असलेल्यांना प्राप्तिकर भरण्यापासून सूट द्यावी. किमान 15 ते 20 लाख रुपये उत्पन्न असलेल्या व्यक्तींसाठी प्राप्तीकराचे दर कमी करावेत.

(Union Budget 2025) अहिल्यानगर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज, शनिवारी लोकसभेत अर्थसंकल्प 2025-26 मांडणार आहेत. सलग आठव्यांदा अर्थसंकल्प मांडत असताना अनेक मोठ्या घोषणा केल्या जातील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. विशेषत: प्राप्तीकरात सूट देऊन मध्यमवर्गीयांना दिलासा दिला जाईल, अशी अपेक्षा आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पॉपकॉर्नवर लावलेल्या जीएसटीचा संदर्भ देत, निर्मला सीतारामन यांच्याकडे काही अपेक्षा व्यक्त केली आहे. (Rohit Pawar expressed expectations from Finance Minister)

आमदार रोहित पवार यांनी ‘X’ या सोशल मी़डिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर केली आहे. पॉपकॉर्नच्या चवीनुसार जीएसटी लावून कायमच मध्यमवर्गीयांची चव बेचव करणाऱ्या अर्थमंत्री सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात खऱ्या अर्थाने मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याची गरज आहे. केवळ आकड्यांचा खेळ न करता मध्यमवर्गीयांचे चार पैसे कसे वाचतील, याकडे अधिक लक्ष द्यावे. एकीकडे वाढत चाललेली महागाई तर, दुसरीकडे जीएसटीच्या भारामुळे माध्यमवर्गीयांचे कंबरडे मोडले आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात प्राप्तिकर स्लॅब सुधारून किमान 10 लाख रुपये उत्पन्न असलेल्यांना प्राप्तिकर भरण्यापासून सूट द्यावी. किमान 15 ते 20 लाख रुपये उत्पन्न असलेल्या व्यक्तींसाठी प्राप्तीकराचे दर कमी करावेत. तसेच, गृहकर्जाचा व्याजदर जास्त असल्याने आजही लाखो मध्यमवर्गीय कुटुंबांचे घराचे स्वप्न अपूर्ण आहे, ते पूर्ण व्हावे म्हणून गृहकर्जावरील व्याजदर कमी करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

हेही वाचा – Union Budget 2025 : टॅक्स स्लॅबमध्ये बदलाची शक्यता, नोकरदारांना मिळणार दिलासा?

आज आरोग्यावरचा खर्च कुणालाही परवडत नाही, या पार्श्वभूमीवर आरोग्य विम्यावरचा जीएसटी कमी केल्यास मध्यमवर्गीयांना अधिक प्रमाणात आरोग्य विमा उतरवता येईल. याद्वारे या बजेटमधून सर्वसामान्यांचे दैनंदिन आयुष्य सुकर होईल, असे निर्णय अर्थमंत्र्यांनी घ्यावेत, अशी विनंती रोहित पवार यांनी केली आहे. (Union Budget 2025: Rohit Pawar expressed expectations from Finance Minister)

हेही वाचा – Union Budget 2025 : जंक फूड्स महागणार; केंद्रीय अर्थसंकल्पात लागणार कर?





Source link

Comments are closed.