Rohit Pawar makes a strange demand on the discussion of alleged toll on two-wheelers


पथकराच्या नियमामध्ये काही बदल झाल्यावर आता दुचाकी वाहनांवरही कर लागणार असल्याच्या काही कथित बातम्या प्रसारमाध्यमांमधून समोर येत आहेत. याच बातम्यांवरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारला चिमटा काढला आहे.

मुंबई : राष्ट्रीय महामार्गांच्या देखभाल-दुरुस्तीचा खर्चही टोल टॅक्समधून केला जातो. यासाठी आता 15 ऑगस्ट 2025 पासून 3 हजार रुपयांचा फास्टॅग आधारित वार्षिक पास सुरू करण्याची योजाना जाहीर करण्यात आली आहे. हा पास सक्रिय झाल्याच्या तारखेपासून एक वर्षासाठी किंवा 200 प्रवासांपर्यंत वैध असेल. तसेच हा पास विशेषत: गैर व्यावसायिक खाजगी वाहनांसाठी म्हणजे कार, जीप आणि व्हॅन अशा वाहनांसाठी तयार करण्यात आला आहे. मात्र पथकराच्या नियमामध्ये काही बदल झाल्यावर आता दुचाकी वाहनांवरही कर लागणार असल्याच्या काही कथित बातम्या प्रसारमाध्यमांमधून समोर येत आहेत. याच बातम्यांवरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारला चिमटा काढला आहे. (Rohit Pawar makes a strange demand on the discussion of alleged toll on two-wheelers)

रोहित पवार यांनी ट्वीट करताना म्हटले की, 15 जुलैपासून दुचाकी वाहनांना देखील टोल लागू करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. जर असं असेल तर सरकारने आता पायी चालणाऱ्यांकडून देखील टोल घ्यायला हवा किंबहुना या मार्गावरून उडणाऱ्या पक्षांनाही टोलच्या कक्षेत कसं आणता येईल, यासाठी एक अभ्यास समिती स्थापन करावी, जेणेकरून शासकीय तिजोरी वेगाने भरेल, असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.

हेही वाचा – Politics : शक्तिपीठ महामार्गावरून फडणवीसांचा इशारा; शरद पवारांनी उडवली खिल्ली

दुचाकीवरील टोलच्या चर्चेवर गडकरींचे स्पष्टीकरण

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दुचीकीवरील टोलच्या चर्चा फेटाळल्या आहेत. त्यांनी ट्वीट करताना म्हटले की, काही प्रसारमाध्यमे दुचाकी वाहनांवर टोल कर लादण्याबाबत दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवत आहेत. परंतु असा कोणताही निर्णय प्रस्तावित नाही. दुचाकी वाहनांना टोलवर पूर्णपणे दिलेली सूट यापुढेही सुरूच राहील. सत्यता न पडताळता दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवून खळबळ उडवणे हे चांगल्या पत्रकारितेचे लक्षण नाही. मी या सगळ्याचा निषेध करतो, असे नितीन गडकरी यांनी म्हटले.

हेही वाचा – Rohini Khadse on Lonikar : जनता लोण्याचे तूपही करू शकते, रोहिणी खडसेंचा लोणीकरांना इशारा





Source link

Comments are closed.