रोहित पवार यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट, अजितदादांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूबाबत दिली सविस्तर माहिती
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी बुधवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी जमा केलेल्या सर्व पुराव्यांबाबत सविस्तर माहिती उद्धव ठाकरे यांना दिली तसेच याबाबत संसदेत आवाज उठवण्याचे सहकार्य करावे अशी विनंती केली.
रोहित पवार यांनी सोशल मीडियावर या भेटीचे फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. ”शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन अजितदादांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूप्रकरणी जमा केलेल्या सर्व पुराव्यांसह सविस्तर माहिती त्यांना दिली आणि संसदेत या विषयावर आवाज उठवण्याकामी सहकार्य करण्याची विनंती केली. महाविकास आघाडीतील एक प्रमुख घटक पक्ष म्हणून या विषयाच्या निष्पक्ष चौकशीकामी आणि अजितदादांना न्याय मिळावा यासाठी पूर्ण ताकदीने सोबत असल्याचा विश्वास त्यांनी दिला. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या काळात अजितदादांनी उद्धव ठाकरे साहेबांसोबत केलेल्या कामालाही उजाळा देण्यात आला”, असे रोहित पवार यांनी ट्विट केले आहे.
Comments are closed.