आंदोलनाने सत्ताधाऱ्यांसह अंधभक्तांचा अहंकार मोडला, दिल्लीत भारत आणि इंडिया एक झाला : रोहित पवार

रोहित पवार: आपले सगळे विद्यार्थी आणि युवा एकत्र आले आणि NEET च्या विद्यार्थ्यांवर जो अन्याय झाला होता, त्याच्या विरोधातला लढा आपण सगळ्यांनी एकत्र येऊन लढल्याचे मत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. अभिजीत दिपके यांनी आंदोलनात सातत्य ठेवलं आणि त्यांना पाठिंबा वाढत गेला. पोलिसांनी दिल्लीत केलेला लाठीचार्ज आणि त्यानंतर अख्खा देश एक झाला, त्या एकीचा विजय काल आपल्याला पाहायला मिळाल्याचे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले. अभिजीत दिपके यांच्यासोबत फोनवरून सतत चर्चा करत होतो असे रोहित पवार म्हणाले. अंधभक्तांचा अहंकार काल तुम्ही सगळ्यांनी मोडला आहे. आंदोलन राजकीय होऊ नये म्हणून आम्ही आधी त्या आंदोलनात गेलो नाही असे रोहित पवार म्हणाले.

हा लढा कुठलाही राजकीय पक्षांनी लढला नाही सामान्य घरातल्या मुलांनी एकत्रित येऊन लढलेला हा लढा आहे. हा लढा विद्यार्थ्यांचा होता त्यानंतर विरोधी पक्षांनी पाठिंबा दिल्याचे मत रोहित पवारांनी व्यक्त केले. भाजप पक्षातले काही नेते आणि त्यांची ट्रोलिंग टीम जी दहा पैशांची आहे ही कशी आहे याचा अभ्यास मला आहे. जर राजकीय नेते व्यासपीठावर दिसले असते तर भाजपने आंदोलनाला वेगळा रंग दिला असता असे मत रोहित पवारांनी व्यक्त केले. अंधभक्तांचा अहंकार काल तुम्ही सगळ्यांनी मोडला आहे. आंदोलन राजकीय होऊ नये म्हणून आम्ही आधी त्या आंदोलनात गेलो नाही.  आता कुठलही विचार न करता पुढे जायचं, तुम्ही लोकांनी ठरवलं म्हणून आपल्याला विजय मिळाल्याचे रोहित पवार म्हणाले. या आंदोलनाने सत्ताधारी लोकांचा अहंकार मोडला आहे.

एका मंत्र्यांचा राजीनामा घेतला हे तुमचं यश

तुम्ही त्यांचा इगो हर्ट केला. अनेक लोक विचार करत होते की लढू का नको? आमच्या भोवती ईडी लागली पण आम्ही कुणाला घाबरत नाही असे रोहित पवार म्हणाले. तुम्ही सगळे भारतीय म्हणून एक आलात. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन तुम्ही एक झालात. आता बरेच लोक रस्त्यावर येऊन न घाबरता लढायला तयार होतील असे मत रोहित पवारांनी व्यक्त केले. एका मंत्र्यांचा तुम्ही राजीनामा घेतला हे तुमचं यश आहे. पाऊस येतोय पण तुम्ही घाबरणार नाहीत एवढ्या मोठ्या बलाढ्य शक्तीला तुम्ही घाबरला नाहीत पावसाला काय घाबराल असेही ते म्हणाले.  या आंदोलनामुळं एकी दिसली. दिल्लीत भारत आणि इंडिया एक झाला.  यापुढे शेतकऱ्यांवर अन्याय झाला तरी एकत्रित या, मजुरावर अन्याय झाला तरी एकत्रित या,  मुलीवर महिलेवर अत्याचार झाला तरी एकत्रित या आता ही तुमची जबाबदारी आहे असे रोहित पवार म्हणाले.

पुढच्या वेळी मतदान कुणाला करायचं ते ठरवून करा

तुमची एकजूट राज्यकर्त्यांना इशारा देत आहे की नीट चाल नाहीतर आम्ही तुझ्याकडे बघून घेऊ. रस्त्यावरचा लढा आपण लढू शकतो. पुढच्या वेळी मतदान कुणाला करायचं ते ठरवून करा. संविधानाच्या आणि लोकशाहीच्या विरोधात जो कोणी कार्य करेल त्याच्या विरोधात आपल्याला रस्त्यावर उतरावे लागणार आहे. आता आपल्यावर जबाबदारी वाढली आहे असे रोहित पवार म्हणाले.

Comments are closed.