बिनविरोधसाठी एवढा अट्टहास का? गिरीश महाजनांसारख्या बेफाम मंत्र्यांचा फडणवीसांनी तत्काळ राजीनामा
गिरीश महाजनांवर रोहित पवार : जामनेर नगरपरिषद निवडणुकीत (Jamner Nagar Parishad Election) नगराध्यक्षपदी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या पत्नी साधना महाजन (Sadhana Mahajan) यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी (शुक्रवारी दि. 21) भाजपचे आणखी 9 उमेदवारही बिनविरोध निवडून आले. मात्र, या बिनविरोध निवडीमागे भाजपने ‘साम-दाम-दंड-भेद’ नीतीचा वापर केला, तसेच उमेदवारांवर दबाव टाकून अर्ज मागे घेण्यास भाग पाडले, असा गंभीर आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. शुक्रवार हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यात जामनेर नगरपरिषद क्षेत्रातील 9 जागांवरील प्रतिस्पर्धी उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. परंतु, अर्ज मागे घेण्याच्या या प्रक्रियेत भाजपकडून मोठ्या प्रमाणात दडपशाही करण्यात आल्याचा विरोधकांचा दावा आहे. आता या प्रकरणावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.
Rohit Pawar on Girish Mahajan: नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
रोहित पवार यांनी एक्स पोस्ट करत म्हटले आहे की, भाजपचे तथाकथित संकटमोचक गिरीश महाजन यांच्या जामनेर शहरात दडपशाहीने वंचितसह समविचारी पक्षाच्या उमेदवारांना सत्तेचा गैरवापर करत दडपशाही मार्गाने बळजबरी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला भाग पाडले गेलं, ही आहे बिनविरोध निवडणुकांची वस्तूस्थिती. बिनविरोधसाठी एवढा अट्टहास का? विकली गेलेली यंत्रणा आणि षंढ असलेला निवडणूक आयोग तर यावर काही बोलणार नाही, पण अशाने लोकशाही अखेरच्या घटका मोजत नाही का? यावर सर्वसामान्य जनतेने मात्र नक्कीच विचार करायला हवा. दडपशाही आणि गुंडगिरी करून लोकशाहीची हत्या करू पाहणाऱ्या, लोकशाहीला घातक असणाऱ्या गिरीश महाजन यांच्यासारख्या बेफाम मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा घेऊन, त्यांचे असले चाळे खपवून घेतले जाणार नाहीत, असा स्पष्ट संदेश द्यावा. गुंडांना जामीन, नेत्यांना जमीन, नेत्यांच्या कुटुंबियांना नगरपरिषदांचे इनाम. भाजपची बिनविरोध कुटुंब कल्याण योजना, असे म्हणत त्यांनी गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.
भाजपचे तथाकथित #स्पिन डॉक्टर गिरीश महाजन यांच्या जामनेर शहरात दडपशाहीने वंचितसह समविचारी पक्षाच्या उमेदवारांना सत्तेचा गैरवापर करत दडपशाही मार्गाने बळजबरी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला भाग पाडले गेलं, ही आहे बिनविरोध निवडणुकांची वस्तूस्थिती!
बिनविरोधसाठी एवढा अट्टहास का? विकली गेलेली… pic.twitter.com/2qHzk8iEpx
– रोहित पवार (@RRPSpeaks) 22 नोव्हेंबर 2025
Jamner Nagar Parishad Election: जामनेरमध्ये 17 जागांसाठी 59 उमेदवार रिंगणात
जामनेर नगरपरिषद निवडणूकीत माघारीनंतर लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून अध्यक्षपदासाठी साधना गिरीश महाजन या बिनविरोध विजयी झाल्या असून नगरसेवक पदाच्या 17 जागांसाठी 59 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये प्रभाग एक मधून भाजपाचे दत्तात्रय जोहरे यांना तीन विरोधी उमेदवारांशी लढत करावी लागणार आहे. तर प्रभाग तीनमधून भाजपाचे बाबुराव हिवराळे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे यांच्यात सामना रंगणार आहे. प्रभाग 9 मधून विद्यमान नगरसेवक आतिष झाल्टे यांचा सामना त्यांचे सखे चुलत भाऊ राष्ट्रवादीचे संतोष झाल्टे यांच्याशी होणार आहे. दरम्यान, भाजपाचे 9 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.