दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत एकत्र; रोहित पवार यांची घोषणा

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढणार आहेत. दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांसाठी हा निर्णय झाला. बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढायचे असेल तर एकत्र यायला हवे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी म्हणत एकत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केली.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे सर्वसाधारण सभेसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार हे उपस्थित आहेत. या बैठकीसाठी रोहित पवार आले असता बाहेर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार आहेत. आम्ही कुठेही घड्याळाच्या चिन्हावर लढणार नाही. आमचे उमेदवार तुतारी आणि घड्याळ हे दोन्ही चिन्ह स्वतंत्र चिन्हावर निवडणूक लढवतील असे स्पष्ट केले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अजित पवार गट आणि शरद पवार गटाचे कार्यकर्ते एकत्र आले. त्यांचाच हा निर्णय आहे. महानगरपालिकेचा विषय आहे. विलीनीकरणाचा विषय असता तर संपूर्ण महाराष्ट्रात आमची युती झाली असती. पण तसं काही झालेलं आपल्याला दिसत नाही. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्येच कार्यकर्त्यांनी एकत्र येण्याचा घेतलेला हा निर्णय घेतला आहे. या निवडणुकांच्या प्रचारामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार हे कुठेच असणार नाहीत. ते महापालिका निवडणुकीच्या प्रचारामध्ये सहभागी नसतात हे आपल्याला माहित आहे, असे सांगून रोहित पवार म्हणाले, शरद पवार त्यांनी सांगितले आहे की कार्यकर्त्यांना विचारात घ्या. त्याप्रमाणे निर्णय घ्या. त्यामुळे वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या निर्णय घेतला आहे. नाशिक मध्ये अजित पवार यांचा पक्ष शिंदे गटाबरोबर एकत्र निवडणूक लढवत आहे.पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये आमचे जागावाटप ठरलेले आहे. परंतु ते सांगणार नाही. उद्या दुपारपर्यंत जागा वाटप आणि संख्या घोषित केली जाईल, असे रोहित पवार म्हणाले.

प्रशांत जगताप यांनी शरद पवार गट सोडल्याच्या प्रश्नावर रोहित पवार म्हणाले, प्रशांत जगताप हे चांगले पदाधिकारी होते. पण त्यांनी का आणि कशामुळे निर्णय घेतला वेगळी आणि मोठी कारणे आहेत. प्रशांत जगताप यांच्याबरोबरचे कार्यकर्ते होते त्यातील 95 टक्के कार्यकर्त्यांचे मत हे आपल्याला घड्याळाबरोबरच जावं लागेल या विचाराचे होते.

पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे निवडणूक लढविणार, अजित पवार यांची घोषणा

काल गौतम अदानी यांच्या बारामती मधील कार्यक्रमात एकत्र आलो म्हणून हा निर्णय झालेला नाही. अनेक दिवस दोन्ही गटाच्या याबद्दल चर्चा होती. स्थानिक लोकांसाठी एकत्र आलो आहोत. आम्ही टाटा समूहाचे प्रमुख तसेच अंबानींना भेटलो आहे. जे जे कोणी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात युवकांना काम देतात संशोधन संस्थांना मदत करतात त्यांना भेटतो. गौतम अदानी यांनी देखील एआय तंत्रज्ञानासाठी सीएसआर च्या माध्यमातून बारामती प्रकल्प उभा केला आहे. या कार्यक्रमासाठी आम्ही एकत्र आलो, असेही रोहित पवार म्हणाले.

बारामतीतील आधुनिक एआय सेंटरचे उद्घाटन; अदानी म्हणाले, शरद पवार माझे मेंटॉर

Comments are closed.