विखे-पाटलांनी केलेलं विधान अत्यंत क्लेशदायक, काठावर बसून त्यांना आमच्या दुःखाची धग कळणार नाही;
राधाकृष्ण विखे पाटलांवर रोहित पवार : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या २८ जानेवारी रोजी झालेल्या अपघाती निधनानंतर (Ajit Pawar Death Plane Crash) राज्याच्या राजकीय वर्तुळात आरोप–प्रत्यारोपांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदांमुळे नवा वाद निर्माण झाला होता. 10 फेब्रुवारी आणि 18 फेब्रुवारी रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी विमान अपघाताच्या चौकशीबाबत काही प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी रोहित पवार अपघाताचे राजकारण करत असून लोकांचा बुद्धिभेद करत आहेत, अशी टीका केली होती. आता राधाकृष्ण विखे पाटलांच्या टीकेला रोहित पवारांनी उत्तर दिलंय.
Rohit Pawar on Radhakrishna Vikhe Patil: रोहित पवारांचे सडेतोड उत्तर
रोहित पवार एक्सवर पोस्ट करत म्हणाले की, ज्येष्ठ नेते विखे-पाटील साहेब यांनी केलेलं विधान अत्यंत क्लेशदायक, आश्चर्यकारक आणि बेजबाबदार आहे. अजिदादांसारखा दुर्दैवी प्रसंग कधीच कुणाच्याही कुटुंबावर ओढवू नये… वेदना काय असते ती ज्याचं जळतं त्यालाच कळतं. अजितदादांच्या अपघाताच्या विषयावर मी राजकारणाचा ‘र’ शब्दही उच्चारला नसताना विखे पाटील साहेब ओढून ताणून या विषयाला राजकारणाशी जोडून विमान अपघाताच्या चौकशीला वेगळं वळण तर देत नाहीत ना? काठावर बसून त्यांना आमच्या दुःखाची धग कळणार नाही, त्यामुळं त्यांनी किमान या विषयाला वेगळे फाटे तरी फोडू नयेत, अशी माझी त्यांना विनंती आहे, असे उत्तर त्यांनी राधाकृष्ण विखे पाटलांच्या टीकेला दिले आहे.
ज्येष्ठ नेते विखे-पाटील साहेब यांनी केलेलं विधान अत्यंत क्लेशदायक, आश्चर्यकारक आणि बेजबाबदार आहे. अजिदादांसारखा दुर्दैवी प्रसंग कधीच कुणाच्याही कुटुंबावर ओढवू नये… वेदना काय असते ती ज्याचं जळतं त्यालाच कळतं. अजितदादांच्या अपघाताच्या विषयावर मी राजकारणाचा ‘र’ शब्दही उच्चारला…
– रोहित पवार (@RRPSpeaks) 18 फेब्रुवारी 2026
Radhakrishna Vikhe Patil on Rohit Pawar: नेमकं काय म्हणाले होते राधाकृष्ण विखे पाटील?
राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं होतं की, अजित पवार यांच्या अपघाताबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही डीजीसीएला (DGCA) पत्र लिहिले आहे. काही गोष्टी तरीही पुढे आणण्याचा प्रयत्न होत आहे आणि राजकारण करण्याचा प्रयत्न होत आहे, ते दुर्दैवी आहे. जी घटना घडली, त्याचं सगळ्यांनाच दुःख झालं आहे. लोकांचा बुद्धिभेद केला जात आहे. कोण काय म्हणतंय याला फार महत्त्व द्यायला नको. हा सगळा सरणावर पोळी भाजण्याचा प्रकार आहे. माझी रोहित पवारांना सूचना आहे की, त्यांनी आरोप करणं, भानगडी बंद कराव्यात. कुटुंबावर दुःखाचा आघात झाला आहे, त्यामध्ये राजकारण कशाला करता? असे त्यांनी म्हटले होते.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.