निलेश घायवळला पासपोर्ट देताना केंद्रात भाजप सरकार होतं, रोहित पवारांनी राम शिंदेंचा दावा खोडून
राम शिंदेवरील रोहित पवार: काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी विधान परिषद सभापती राम शिंदे (Ram Shinde) आणि कुख्यात गुंड निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) यांच्यात हितसंबंध असल्याचा आरोप केला होता. तसेच, निलेश घायवळ याच्या परदेशगमनास राम शिंदे यांनीच मदत केली, असा ठपका ठेवला होता. या पार्श्वभूमीवर राम शिंदे यांनी ‘एबीपी माझा’शी रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. निलेश घायवळला पासपोर्ट मिळवून देण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामार्फत रोहित पवार यांनीच मदत केली होती, असा दावा त्यांनी केला. आता रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्यावर पलटवार केलाय.
रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलंय की, मा. प्रा. राम शिंदे सर, पासपोर्ट राज्य सरकार नाही तर केंद्र सरकार देत असतं, एवढी साधी गोष्ट आपणास कळत नसेल तर हे दुर्दैव म्हणावं लागेल. घायवळ देशाबाहेर आहे, आपणही मागील काही दिवस देशाबाहेर होतात म्हणून कदाचित अहिल्यानगर SP साहेबांनी दिलेलं स्पष्टीकरण आपण पाहिलं नसावं, ते आपण नक्की बघा. पासपोर्ट 2020 साली मिळाला. तेव्हा केंद्रात भाजपचं सरकार होतं याचा विसर पडला का? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
आई. प्रा. राम शिंदे सर,
पासपोर्ट राज्य सरकार नाही तर केंद्र सरकार देत असतं, एवढी साधी गोष्ट आपणास कळत नसेल तर हे दुर्दैव म्हणावं लागेल. घायवळ देशाबाहेर आहे, आपणही मागील काही दिवस देशाबाहेर होतात म्हणून कदाचित अहिल्यानगर SP साहेबांनी दिलेलं स्पष्टीकरण आपण पाहिलं नसावं, ते आपण… pic.twitter.com/fpf1bl967x– रोहित पवार (@rrpspeaks) 14 ऑक्टोबर, 2025
Rohit Pawar on Ram Shinde: सरकार तुमचंय, मग घाबरता कशाला?
ज्यांना आपण राजरोसपणे विधीमंडळात घेऊन फिरलात, निवडणुकीत स्वतःच्या प्रचारासाठी ज्यांना संपूर्ण मतदारसंघात फिरवलंत, जे जाहीरपणे आपले चरणस्पर्श करतात, ज्यांची जाहिरपणे ओळख आपण इतर आमदारांना करून देतात त्यांच्याशी दूरदूरपर्यंतचा संबंध नाही असं कसं? मग दूरदूरपर्यंतचा संबंध नाही तर खूप जवळचा संबंध आहे, असं तर म्हणायचं नाही ना आपल्याला? आता प्रकरण अंगलट आल्याने गोल-गोल फिरवण्यापेक्षा घायवळने तुमचा प्रचार केला की नाही? तुमच्या बहुतांश सभांमध्ये घायवळने भाषणं केली की नाही? मुख्यमंत्र्याच्या स्टेजवर तुम्ही घायवळला बसवलं की नाही? ते सांगा. मुख्यमंत्र्यांनी घोषित केल्याप्रमाणे पासपोर्ट कुणी दिला, बंदूक परवान्यासाठी कुणी शिफारस केली या सगळ्याची तत्काळ चौकशी करून सत्य समोर आणा. सरकार तुमचं आहे, तर मग घाबरता कशाला? असे म्हणत रोहित पवार यांनी राम शिंदेंवर निशाणा साधलाय.
Ram Shinde on Rohit Pawar: नेमकं काय म्हणाले राम शिंदे?
राम शिंदे एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की, रोहित पवार हे बिनसलेले व्यक्तिमत्व असून ते दररोज खोटं बोलण्याचे काम करतात. निलेश घायवळ प्रकरणात रोहित पवार हे धादांत खोटे बोलत आहेत. मात्र, ते आता तोंडघशी पडले आहेत. निलेश घायवळ यांना अनिल देशमुख यांच्या माध्यमातून रोहित पवार यांनीच पासपोर्ट मिळवून दिला होता. 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीवेळी रोहित पवार यांनीच निलेश घायवळ याला प्रचारात उतरवले होते. माझा आणि निलेश घायवळचा दूरपर्यंत एकमेकांशी संबंध नाही, असे त्यांनी सांगितले.
https://www.youtube.com/watch?v=xueiujyvvzs
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.