मुंबईत एकत्र लढण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा ‘वेट अँड वॉच’; रोहित पवार स्पष्टच बोलले..
शिवसेना यूबीटी मनसे युतीवर रोहित पवार : ठाकरे बंधू (Shivsena UBT MNS Yuti) आज पत्रकार परिषद घेत आहेत, त्यात ते काय जाहीर करतात हे पाहुया. आमचे लोक काल त्यांना भेटले आहेत. आम्ही कुठून लढू इच्छित आहे हे त्यांना सांगितल आहे. 2 दिवसांत आम्हाला निर्णय आला नाही तर स्वबळावर जाण्याबाबत निर्णय घेऊ. ठाकरे बंधू न्याय देत नसतील तर काँग्रेस सोबत वेगळा निर्णय घेऊ, अशी अभिप्राय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) दिलीय.
रोहित पवार : ठाकरे बंधू न्याय देत नसतील आम्ही निर्णय घेऊ
महाविकास आघाडी म्हणून एकत्र आलं पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न असेल. ठाकरे बंधू एकत्र लढायचं ठरवलं आणि कुणाला घ्यायच नाही असं ठरवलं तर आम्ही आणि काँग्रेस एकत्र लढू. आम्हाला ठाकरे न्याय देत नसतील आम्ही निर्णय घेऊ, असेही रोहित पवारांनी यावेळी सांगितलंहे. ठाकरे बंधू केवळ आम्हाला 15 जागा द्यायला इच्छुक आहेत. त्यातील बहुतांश जागा पडणाऱ्या आहेत. त्यामुळे त्यांनी जे जिंकणारे उमेदवार आहेत त्यांना संधी द्यायला हवी. त्यांनी हट्ट करून उपयोग नाही, अन्यथा वेगळा निर्णय घ्यावा लागेल असेही रोहित पवार म्हणाले.
पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये भाजप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाआणिआम्ही एकत्र आलो तर भाजपला रोखू
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत आहे. पाच सहा कंत्राटदार मिळून भ्रष्टाचार करत आहेत. तिथे अजित पवारांची राष्ट्रवादी आणि आम्ही एकत्र आलो तर भाजपला रोखू शकतो, असं वाटत आहे. त्यामुळे आम्ही 2 दिवसांत याबाबत निर्णय घेऊ असेही रोहित पवार म्हणाले. तर प्रशांत जगताप बाबत बोलताना रोहित पवार म्हणाले तेकार्यकर्ता जर काही वेगळं समीकरण सांगत असेल तर ऐकून घ्यायला हवं. भावनिक होऊन चालत नाही. पक्ष हित लक्षात घेत प्रशांत जगताप योग्य निर्णय घेतील, असेही ते म्हणाले.
Rohit Pawar on BJP : शिंदेचा बुरुज रवींद्र चव्हाण फोडत आहेत
शिंदेंच्या शिवसेनेला 110 जागांची अपेक्षा आहे, ती पूर्ण होणे शक्य नाही. केवळ त्यांचा मराठी मतांसाठी उपयोग होईल, म्हणून सोबत घेत आहेत. दुसरीकडे शिंदेचा बुरुज रवींद्र चव्हाण फोडत आहेत. अशी स्थिती अजित पवारांची आहे, असेही रोहित पवार म्हणाले. तर मयूर शिंदे यांच्या भाजप प्रवेशाबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले तेज्यांनी पालघरमधे साधू हत्याकांड केलं असा आरोप भाजपने केला. त्यांनाच भाजपने सोबत घेतलंहे. राम शिंदे आपल्या मतदारसंघात हेच करत आहे. सर्व गुंडांना तिकिटे देत आहे. शेवटी वरिष्ठ पातळीवर जे घडत आहे तेच खालच्या पातळीवर आपल्याला दिसत आल्याचंहे रोहित पवार म्हणाले.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.