Rohit Pawar request to Devendra Fadnavis and Ajit Pawar by tweeting a video of the Koyata gang in Pune
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात ‘कोयता गँग’ अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुण्यातील कोयचा गँगचा व्हिडीओ ट्वीट करत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री अजित पवार यांना लक्ष घालण्याची विनंती केली आहे.
पुणे : विद्येच्या माहेरघर असलेल्या पुण्यात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. खासकरून पुणे शहरात अधूनमधून कोयता गॅंगची दहशत पाहायला मिळते. मात्र नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात ‘कोयता गँग’ अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच माध्यमांनी हे नाव दिल्याचा दावाही फडणवीस यांनी केला होता. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुण्यातील कोयचा गँगचा व्हिडीओ ट्वीट करत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री अजित पवार यांना लक्ष घालण्याची विनंती केली आहे. (Rohit Pawar request to Devendra Fadnavis and Ajit Pawar by tweeting a video of the Koyata gang in Pune)
रोहित पवार यांनी ट्वीट करताना म्हटले की, पुण्यातल्या कोयता गँगचा बंदोबस्त करण्याचा प्रश्न अधिवेशनात उपस्थित करण्यात आला होता. मात्र तेव्हा सरकारने कोयता गँग अस्तित्वात नसल्याचे सांगितले होते. पण हा बघा कोयता गँगचा कालचा थरार. पुण्यातील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे, त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी लक्ष घालावे, अशी विनंती रोहित पवार यांनी केली आहे.
हेही वाचा – Prithviraj Chavan : भाजपाने भूमिका बदलल्यामुळेच…; जातनिहाय जनगणनेवर काय म्हणाले चव्हाण?
पुण्यातल्या कोयता गँग चा बंदोबस्त करण्याचा प्रश्न अधिवेशनात उपस्थित केला असता सरकारने कोयता गँग अस्तित्वात नसल्याचे सांगितले होते….आणि हा बघा कोयता गँग चा कालचा थरार! पुण्यातील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे, गृहमंत्री आणि पालकमंत्री महोदयांनी लक्ष घालावे, ही विनंती!… pic.twitter.com/dMZnjFL2IK
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 3, 2025
रोहित पवार यांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओमध्ये काय?
रोहित पवारांनी शेअर केलेला सीसीटीव्ही व्हिडीओ पुण्यातील बिबवेवाडी भागातील आहे. या व्हिडीओमध्ये दिसते की, वर्दळीच्या रस्त्यावर काही तरुण गर्दी करून उभे आहेत आणि दोन गटात अचानक हाणामारी सुरू होते. त्यावेळी एका गटातील तरुण कोयता काढून समोरच्या व्यक्तीवर वार करताना दिसत आहे. यावेळी दोन्ही गटातील तरुण एकमेकांवर दगड आणि कोयता या सारख्या वस्तूंनी मारहाण करताना दिसत आहेत.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?
वडगाव शेरीचे आमदार बापू पठारे यांनी हिवाळी अधिवेशनात पुण्यातील ‘कोयता गँग’च्या दहशतीकडे सभागृहाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, पुण्यात ‘कोयता गँग’ अस्तित्वात नाही. माध्यमांनी हे नाव दिले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले होते.
हेही वाचा – chhagan bhujbal : मला सुध्दा मुख्यमंत्री पदाची ऑफर होती पण…. भुजबळांनी सांगितले नेमकं कारण
Comments are closed.