सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल यांना संपूर्ण पक्षाचा ताबा घ्यायचा होता, रोहित पवार यांचा मोठा आरोप
प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे यांना अजित दादा यांच्या पक्षाचा संपूर्णपणे ताबा घ्यायचा होता, असा मोठा आरोप ऱाष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार व अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार यांनी विधानभवनाबाहेर पत्रकारांशी बोलताना हा iगंभीर आरोप केला आहे.
”प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना पक्षाचा ताबा घ्यायचा होता. अजित दादा हयातीत असताना जे फालतू खर्च होते ते करता येत नव्हते. काही गोष्टी पार्टीत चुकीच्या पद्धतीने होत होत्या. काही लोकांचे कर्तुत्व नसताना त्यांना मोठी मोठी पदं दिली जात होती. दादा कार्यकर्त्यांचं ऐकत होते पण यांचं ऐकत नव्हते. या लोकांना अख्खी पार्टी आपल्या कंट्रोलमध्ये यावी असं वाटत होतं”, असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. ”मला सुनेत्राकाकींना एवढंच सांगायचं आहे की राजकारण लय वंगाळ झालं आहे, अवतीभवती जी लोकं आहेत त्यांच्याबद्दल काळजी घ्यावी लागेल”, असंही ते म्हणाले.
”अधिवेशनात दादांच्या निधनाबाबत एक दोन आमदार सोडले तर एकही आमदार बोलला नाही कारण सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं होतं की याविषयावर अजिबात बोलायचं नाही. जय पवार पत्रकार परिषद घ्यायची होती. पण ती का नाही झालं माहित नाही. जय लढणारा आहे, पवार आहे. मराठी माणूस आहे. त्याचा आवाज दाबण्याचा कोण प्रयत्न करतंय का? हे सगळं बघून आम्हाला वाटतं की हे सगळे कट आधीच रचले होते का? त्यामुळे आम्ही सातत्याने बोलत होतो की क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन व्हायला हवं. त्यासाठी एफआय़र होणं गरजेचं होतं. तो एफआय़आर काल कर्नाटकात झाला. तो कालच महाराष्ट्राकडे ट्रान्स्फर करण्यात आला आहे. हा तपास आता महाराष्ट्र पोलिसांकडे आला आहे. महाराष्ट्र गृहमंत्रालय , पोलीस यावर काय निर्णय घेतात ते बघावं लागेल”, असेही ते म्हणाले.
Comments are closed.