…तर भाजप 20 जागांच्या वर देखील गेली नसती – रोहीत पवार
![rohit-pawar](https://marathi.tezzbuzz.com/wp-content/uploads/2025/02/rohit-pawar-696x447.jpg)
दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या निकालाचे चित्र आता स्पष्ट होत आले आहे. दिल्लीत सध्या भाजप 48 जागांवर तर आप 22 जागांवर आघाडीवर आहे. या निवडणूकीत काँग्रेसला मतदारांनी एकही जागा मिळू दिलेली नाही. काँग्रेस व आपने एकत्र निवडणूक न लढण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे दोन्ही पक्षांना त्याचा जबर फटका बसला आहे.
दिल्लीतील निकालावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहीत पवार यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. ”दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल भाजपचे अभिनंदन! 15 हून अधिक ठिकाणी भाजपच्या विजयी उमेदवारांचे मताधिक्य तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराने मिळवलेल्या मतापेक्षा खूप कमी आहे. ही सर्व आकडेवारी बघितली असता INDIA आघाडी असती तर भाजपा 20 जागांच्या वर देखील गेली नसती. दिल्ली निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या नेतृत्वात सरकार स्थापन व्हावे ही माझी व्यक्तिगत भावना होती. उचित-अनुचित अशा सर्व मार्गांचा वापर करून निवडणुका लढणाऱ्या भाजपसारख्या महाशक्ती विरोधात लढताना समान विचारधारा असलेल्या पक्षांनी एक-दोन पाऊल मागे-पुढे घेण्याची गरज होती, परंतु दुर्दैवाने इंडिया आघाडीतील पक्षांनी आपापले इगो बाजूला सारले नाहीत, परिणामी अशक्य असणारी विजयश्री भाजपाने खेचून आणली. ही बाब ट्रॅडिशनल पद्धतीने लढणाऱ्या सर्व नेत्यांनी लक्षात घ्यायला हवी”, असे रोहीत पवार म्हणाले.
Comments are closed.