हिटमॅनचा मराठी बाणा! म्हणाला… मुंबईत राहतो तर मराठी येणारच; चाहत्यांची जिंकली मनं

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा हा अनेकदा मराठी बोलताना दिसून आला आहे. त्याचा मराठीत संवाद साधतानाचा आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात मराठी कलाकारांशी मराठीतच बोलताना दिसत आहे.

‘थेट तुमच्या घरातून’ या नाटकाचे कलाकार नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, ओमकार राऊत हे इतर कलाकरांसोबत एका हॉटेलमध्ये गेले होते. त्यावेळी टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्मा हा त्याच्या मित्रांना भेटण्यासाठी त्या हॉटेलमध्ये आला होता. नम्रताने रोहितला पाहिल्यावर त्याच्याशी मराठीत बोलायला सुरुवात केली. नम्रताने त्याला “कसे आहात तुम्ही?” असे विचारताच त्यावर रोहितने “मी मजेत आहे” असे उत्तर दिले. त्यानंतर नम्रता त्याला सांगते तिने अनेकदा रोहितला मराठीत बोलताना पाहिले आहे. त्यामुळे ती त्याच्याशी मराठीत बोलली. त्यावर रोहितने दिलेल्या उत्तराने सर्वांची मनं जिंकली. ”मुंबईमध्ये राहतो तर मराठी तर येणारच”, असे तो म्हणाला.

सोशल मीडियावर रोहित व नम्रतामधील या संभाषणाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. मैदानावरील खेळाने चाहत्यांची मने जिंकणाऱ्या रोहितने या उत्तराने महाराष्ट्रातील तमाम मराठी जनतेची देखील मनं जिंकली आहेत.

Comments are closed.