Rohit Pawar targets the government along with the Censor Board


सेन्सॉर बोर्डावर सरकारने Nonsense लोकांना नेमले आहे, म्हणूनच ‘गोलपिठा’च्या माध्यमातून दलित अत्याचाराविरोधात विद्रोहाची तलवार उपसणाऱ्या पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्याबाबतीत ‘कोण नामदेव ढसाळ?’ असे विचारण्याची त्यांची हिंमत झाली.

(Namdeo Dhasal) अहिल्यानगर : मराठी साहित्य विश्वातील क्रांतिकारी कवी आणि दलित पँथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित ‘चल हल्लाबोल’ हा सिनेमा सेन्सॉर बोर्डाच्या (सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन) कात्रीत सापडला आहे. ‘कोण नामदेव ढसाळ?’ असा उर्मट प्रश्न विचारत त्यांची एक कविता न वगळल्यास सिनेमाच्या प्रदर्शनास परवानगी नाकारली आहे. यावरून तीव्र पडसाद उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. (Rohit Pawar targets the government along with the Censor Board)

नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित ‘चल हल्ला बोल’ सिनेमा 1 जुलै 2024 रोजी मान्यतेसाठी सेन्सॉर बोर्डाकडे सबमिट करण्यात आला होता. पण, सिनेमातील कवितांमध्ये शिव्या आणि अश्लीलता असल्याचे मत सेन्सॉर बोर्डाच्या अधिकार्‍यांनी मांडले. विशेषत:, या सिनेमातील ‘रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो…’ या कवितेवर आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर या कविता नामदेव ढसाळ यांनी लिहिल्याची माहिती सेन्सॉर बोर्डाच्या अधिकार्‍यांना देण्यात आली. त्यावर कोण नामदेव ढसाळ? आम्ही ओळखत नाही, असे उत्तर या अधिकार्‍यांनी दिले. एवढेच नाही तर या कविता सिनेमातून वगळाव्यात, असे सेन्सॉर बोर्डाने लेखी कळवले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यासंदर्भात ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून पोस्ट केली आहे. सेन्सॉर बोर्डावर सरकारने Nonsense लोकांना नेमले आहे, म्हणूनच ‘गोलपिठा’च्या माध्यमातून दलित अत्याचाराविरोधात विद्रोहाची तलवार उपसणाऱ्या पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्याबाबतीत ‘कोण नामदेव ढसाळ?’ असे विचारण्याची त्यांची हिंमत झाली, असे सुनावतानाच, आपल्या अज्ञानातून ‘यू’टर्न घेण्यासाठी सरकारने Sense असलेल्या लोकांनाच सेन्सॉर बोर्डावर नेमण्याची गरज आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.

दिग्दर्शकाची नाराजी

‘चल हल्लाबोल’ या सिनेमाच्या माध्यमातून दलित, आदिवासी, भटके-विमुक्त, शेतकरी, अल्पसंख्याक, मुस्लीम, स्त्रिया इत्यादींच्या शोषणाविरुद्धचा लढा दाखवण्यात आला आहे. हा सिनेमा 6 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित करण्यात येणार होता. पण, सेन्सॉर बोर्डाने परवानगी नाकारल्यामुळे सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागली. हा सिनेमा रिवायजिंग कमिटीकडे पाठवत त्याची रीतसर फीदेखील भरण्यात आली. तरीही सेन्सॉर बोर्डाच्या कोणत्याच अधिकार्‍याकडून आम्हाला प्रतिसाद मिळत नाही, अशी नाराजी सिनेमाचे दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा – Sanjay Raut on मराठी : औरंगजेबासारखेच एकनाथ शिंदे…, काय म्हणाले संजय राऊत?





Source link

Comments are closed.