Rohit Pawar’s criticism of the central government regarding the fall of the rupee msj
आजच्या काळात वस्तुस्थिती सांगितली तरी ऐकणार कोण? आणि ऐकणारे असेल तर याकडे लक्ष द्यावे, एवढीच अपेक्षा असल्याचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.
(Rohit Pawar about Economy) मुंबई : जगभरातील इतर प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलरचे मजबूत झाल्याने तसेच देशांतर्गत शेअर बाजारातील घसरणीमुळे मंगळवारी रुपया नऊ पैशांनी घसरून 85.15 या नवीन सार्वकालिक नीचांकी पातळीवर बंद झाला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP SP) आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करत केंद्र सरकारला टोला लगावला आहे. (Rohit Pawar’s criticism of the central government regarding the fall of the rupee)
अमेरिकन चलन डॉलर मजबूत झाल्यामुळे मंगळवारी रुपयाचे मूल्य 9 पैशांनी घसरून 85.19वर आले. 19 डिसेंबर 2024 रोजी रुपया 85.08वर बंद झाला होता. डॉलरचे मजबूत होणे आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे रुपयात घसरण झाली असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. विदेशी चलन व्यापाऱ्यांच्या मते, अमेरिकन डॉलरची मागणी आणि भू-राजकीय अनिश्चिततेमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ या कारणांमुळे रुपयाची घसरण सुरूच आहे.
‘डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला’
सध्या वृत्तपत्रात अशा बातम्या रोजच दिसतात, पण याला केंद्र सरकार किंवा अर्थमंत्री हे जबाबदार नाहीत..
कारण नक्कीच पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती वाढत असल्याने रुपया (₹) वर जाण्याऐवजी खाली घसरत असावा आणि त्यातच #GST अधिक असल्याने तो जरा जास्तच वेगाने…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 25, 2024
– Advertisement –
अमेरिकेची सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हचे आक्रमक धोरण आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील सुधारणा यामुळे डॉलरला आणखी बळकटी मिळू शकेल, असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, याचा फटका भारताला मोठ्या प्रमाणावर बसत असून रुपयाची घसरण कायम राहिल्यास भारतीयांना नुकसान सहन करावे लागणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने काही उपाययोजना केल्यास रुपयात काहीप्रमाणत सुधारणा होऊ शकते, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे.
– Advertisement –
या पार्श्वभूमीवर एनसीपी एसपीचे आमदार रोहित पवार यांनी ट्वीट केले आहे. सध्या वृत्तपत्रात डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला’ अशा बातम्या रोजच दिसतात, पण याला केंद्र सरकार किंवा अर्थमंत्री हे जबाबदार नाहीत. कारण नक्कीच पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती वाढत असल्याने रुपया वर जाण्याऐवजी खाली घसरत असावा आणि त्यातच जीएसटी अधिक असल्याने तो जरा जास्तच वेगाने घसरत असावा, असा टोला त्यांनी लगावला आहे. नाहीतरी आजच्या काळात वस्तुस्थिती सांगितली तरी ऐकणार कोण? आणि ऐकणारे असेल तर याकडे लक्ष द्यावे, एवढीच अपेक्षा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. (Rohit Pawar about Economy: Rohit Pawar’s criticism of the central government regarding the fall of the rupee)
हेही वाचा – SS UBT Vs Mahayuti : दोन्ही खून सरकार पुरस्कृत असल्याने…, ठाकरे गटाचे सरकारवर टीकास्त्र
Comments are closed.