आयपीएल 2026साठी रोहित सज्ज! मुंबईला पुन्हा चॅम्पियन बनवण्यासाठी हिटमॅनचा मास्टरप्लॅन तयार

च्याt20 विश्वचषक 2026 संपायला आता फक्त एक दिवस उरला आहे. महिनाभरापूर्वी सुरू झालेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात (८ मार्च) रोजी खेळवला जाईल. यानंतर चाहत्यांच्या नजरा आयपीएल २०२६ कडे लागल्या आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली या स्पर्धेच्या माध्यमातून मैदानात पुनरागमन करणार आहेत. यापूर्वी ते न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळताना दिसले होते. आता आयपीएलमध्ये परतण्यासाठी रोहित शर्माने तयारी सुरू केली असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे, ज्यामध्ये तो शिवाजी पार्क येथे नेट प्रॅक्टिस करताना दिसत आहे. रोहित आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसेल. रोहित मुंबईतच राहतो आणि तो प्रसिद्ध शिवाजी पार्क क्रिकेट मैदानावर जाऊन तरुण खेळाडूंसोबत वेळही घालवत आहे. तो आपल्या IPL ची तयारी करत आहे, याच निमित्ताने तरुण गोलंदाजांना रोहितसारख्या मोठ्या खेळाडूसमोर आपले कसब दाखवण्याची संधी मिळत आहे.
गेल्या वर्षी रोहित शर्मा बहुतेक सामन्यांमध्ये फक्त फलंदाजी करताना दिसला होता आणि क्षेत्ररक्षणादरम्यान (फील्डिंग) त्याला विश्रांती देण्यात आली होती. मात्र, रोहित आता ‘स्लिम आणि सुपरफिट’ झाला आहे. काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की, रोहित शर्माला आयपीएल २०२६ मध्ये ‘इम्पैक्ट प्लेयर’ म्हणून खेळण्याची इच्छा नाही.
आता रोहित पूर्णपणे फिट झाला असून आयपीएल २०२६ पूर्वी मैदानात घाम गाळत आहे. यावरून असे संकेत मिळत आहेत की, रोहितला आयपीएल २०२६ मध्ये क्षेत्ररक्षणादरम्यान पूर्ण २० षटके मैदानात राहायचे आहे आणि मुंबई इंडियन्सच्या विजयात योगदान द्यायचे आहे. विशेष म्हणजे, मार्च २०२६ च्या शेवटच्या आठवड्यापासून IPL ची सुरुवात होऊ शकते.
Comments are closed.