रोहित शर्माचं खणखणीत शतक; ‘तरुण संघात अनफिट’, ‘त्यांचं क्रिकेट संपलं’ म्हणणारे तोंडघशी पडले, पा


रोहित शर्माचे शतक इंडस्ट्रीज विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरी वनडे : तब्बल 10 किलो वजन घटवून स्वत:मध्ये आमुलाग्र कायापलाट घडवून आणणारा भारतीय संघाचा फलंदाज रोहित शर्मा याने शनिवारी सिडनीच्या मैदानावर आपण अजूनही बावनकशी सोनंच असल्याचं दाखवून दिले. गेल्या सामन्यात 74 धावा झळकावणाऱ्या रोहित शर्मा याने सलग दुसऱ्या सामन्यात संयमाने मोठी खेळी साकारत आपल्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. रोहित शर्मा याने 105 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. कोहली आणि रोहितची दुसऱ्या विकेटसाठीची भागीदारी 130+ धावांची झाली. यासह, रोहित ऑस्ट्रेलियामध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके करणारा फलंदाज बनला आहे.

वाढलेलं वजन आणि सुटलेलं पोट यामुळे 2027 साली होणाऱ्या आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या तरुण खेळाडूंच्या संघात रोहित शर्मा फिट बसणार नाही, अशी चर्चा अनेकदा रंगायची. याच कारणामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी रोहित शर्मा याच्याकडून टीम इंडियाच्या एकदिवसीय संघाचे कर्णधारपद काढून ते गिलला देण्यात आले होते. मात्र, या सगळ्यावर रोहित शर्माने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. अखेर आज सिडनीच्या मैदानात रोहित शर्माने त्याच्यावर अविश्वास दाखवणाऱ्या सर्व टीकाकारांची तोंडं बंद करत आपल्यात अजूनही बरेच क्रिकेट बाकी असल्याचे आणि आपल्या खेळाचा क्लास अजूनही कायम असल्याचे दाखवून दिले. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी शतकी भागीदारी करुन भारतीय क्रिकेट रसिकांची गेल्या अनेक दिवसांपासूनची इच्छा पूर्ण केली.

रोहित शर्माचं एकदिवसीय कारकिर्दीतील 33 वे शतक

भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज रोहित शर्माने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 33 वे शतक झळकावले. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने 105 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने शानदार शतक झळकावले. अ‍ॅडलेडमध्ये 73 धावांची शानदार खेळी करणाऱ्या रोहितने सिडनीमध्ये शानदार फलंदाजी करत शानदार शतक झळकावले. रोहित शर्माचे हे या वर्षातील दुसरे शतक आहे. यापूर्वी त्याने फेब्रुवारीमध्ये इंग्लंडविरुद्ध शानदार शतक झळकावले होते. सिडनीमध्ये शतक झळकावल्यानंतर रोहितने त्याच्या निवृत्तीबद्दल अटकळ बांधणाऱ्या टीकाकारांना चोख उत्तर दिले आहे.

हे ही वाचा –

देशाची मान शरमेने खाली गेली, इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंची छेडछाड, हॉटेलमधून कॅफेत जात असताना नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.