रोहित अन् विराट ODI फॉरमॅटमधूनही निवृत्ती घेणार?; ऑस्ट्रेलिया क्रिकेटच्या सीईओचं मोठं विधान


रोहित शर्मा आणि विराट कोहली सेवानिवृत्ती: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताच्या एकदिवसीय आणि टी-20 संघांची (Ind vs Aus) घोषणा करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीचा (Virat Kohli) संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र रोहित शर्माच्या जागी आता शुभमन गिलला (Shubhman Gill) भारताच्या एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, आता रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या एकदिवसीय फॉरमॅटमधूनही निवृत्तीबाबत महत्वाची माहिती समोर येत आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहलीने अद्याप निवृत्तीबाबत बीसीसीआयला कळवले नसले तरीही 2027 च्या विश्चचषकाबाबतही योग्य तो निर्णय कळवलेला नाहीय. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा झाल्यानंतर, निवडकर्ता आणि माजी क्रिकेटपटू अजित आगरकर यांना 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकात रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या सहभागाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही सध्या यावर भाष्य करू इच्छित नाहीत, अशी माहिती अजित आगरकर यांनी दिली.

सुनील गावसकर काय म्हणाले? (Sunil Gavaskar On Rohit Virat)

रोहित शर्मा आता 38 वर्षांचा आहे. 2027 च्या विश्वचषकापर्यंत रोहित शर्मा 40 वर्षांचा होईल. तर विराट कोहली सध्या 36 वर्षांचा असून 2027 च्या विश्वचषकापर्यंत तो 38 वर्षांचा होईल.  परिणामी, पुढील दोन वर्षांत टीम इंडियाला कमी एकदिवसीय सामने खेळावे लागतील. दरम्यान, रोहितला विश्वचषकात खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त राहावे लागेल. विश्वचषकासाठी संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला एकदिवसीय सामन्यांव्यतिरिक्त देशांतर्गत क्रिकेट देखील खेळावे लागेल, असं भारतीय क्रिकेट संघाचे माजी दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर यांनी म्हटलं आहे.

रोहित-विराटचा शेवटचा ऑस्ट्रेलिया दौरा?- (Ind vs Aus ODI Series 2025)

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी अद्याप एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली नाही. पण 2027 च्या विश्वचषकापर्यंत क्रिकेट खेळत राहतील, याबाबत कोणतीही हमी रोहित शर्मा आणि विराट कोहलीकडून देण्यात आलेली नाहीय. त्यामुळे रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा ऑस्ट्रेलियन भूमीवरील हा शेवटचा दौरा असू शकतो, असे सांगतिले जात आहे.  क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ टॉड ग्रीनबर्ग म्हणाले, विराट आणि रोहितला आपल्या (ऑस्ट्रेलियात) देशात खेळताना पाहण्याची ही शेवटची वेळ असू शकते.

एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक- (Ind vs Aus ODI Schedule)

  1. 19 ऑक्टोबर – पहिली एकदिवसीय (पर्थ)
  2. 23 ऑक्टोबर- दुसरी एकदिवसीय (अ‍ॅडलेड))
  3. 25 ऑक्टोबर- तिसरी एकदिवसीय (सिडनी)

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठीचा भारतीय संघ- (Team India ODI Squad vs Australia)

शुबमन गिल- कर्नाधार, श्रेयस अय्यर- उपदेशरना, विराट कोहली, रोहित शर्मा, अक्षर पटेल, के.एल. राहुल नितीष कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर कुलदीप यादव, हरशीत राणा, मोहम्मद सिराज, अरशदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव ज्युरेल, यशासवी जारस्वाल.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेसाठीचा भारतीय संघ- (Team India T20 Squad vs Australia)

सूर्यकुमार यादव- कर्णधार, अभिषेक शर्मा, शुभमन गिल- उपकर्णधार, तिलक वर्मा,नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीकरक्षक), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर.

संबंधित बातमी:

Rohit Sharma Salary Ind vs Aus ODI: शुभमन गिल एकदिवसीय संघाचा कर्णधार; रोहित शर्माला आता किती पगार मिळणार?

Ind beat Wi 1st Test : टीम इंडियाने फक्त तीन दिवसांत वेस्ट इंडिजचा फडशा पाडला, अहमदाबाद कसोटीत भारताचा मोठा विजय, WTC क्रमवारीत काय बदल?

आणखी वाचा

Comments are closed.