रोहिराट किती महिन्यांनी खेळणार वनडे सामना? शेवटच्या सामन्यात कामगिरी कशी?

अलिकडेच भारत-इंग्लंड (India vs England) संघात 5 सामन्यांची टी20 मालिका खेळली गेली. या मालिकेत भारतीय संघाने वर्चस्व गाजवले. भारताने ही मालिका 4-1 ने आपल्या खिशात घातली. आता दोन्ही संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जाईल, ज्याची सुरूवात (6 फेब्रुवारी) पासून होईल. दरम्यान भारतीय संघ रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली मैदानात उतरताना दिसेल. पण भारतीय संघाचे दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) किती कालावधीनंतर वनडे सामना खेळणार आहेत? याबद्दल जाणून घेऊया.

रोहित शर्मा आणि विराट कोहली जवळजवळ 6 महिन्यांनंतर भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये खेळणार आहेत. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने त्याच्या शेवटच्या वनडे मालिकेत 157 धावा केल्या होत्या. त्याच वेळी, त्या मालिकेत विराट कोहलीने फक्त 58 धावा केल्या. तसेच, या मालिकेत भारतीय संघाला श्रीलंकेकडून 2-0 असा पराभव पत्करावा लागला.

तथापि, इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली कशी कामगिरी करतात हे पाहणे देखील उत्सुकतेचे ठरेल. यापूर्वी, रोहित शर्मा आणि विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये (Border Gavaskar Trophy 2024-25) वाईटरित्या अपयशी ठरले होते.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (ICC Champions Trophy) (19 फेब्रुवारी) पासून सुरू होत आहे. त्याच वेळी, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात आपल्या मोहिमेची सुरूवात करेल. भारत-बांगलादेश (India vs Bangladesh) संघ (20 फेब्रुवारी) रोजी आमने-सामने येतील. यानंतर कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान संघ (23 फेब्रुवारी) रोजी आमने-सामने येतील. त्याच वेळी, भारत आपला शेवटचा साखळी सामना न्यूझीलंडविरूद्ध (2 मार्च) रोजी खेळेल.

इंग्लंडविरूद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, हर्षित राणा

आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, रिषभ पंत, रवींद्र जडेजा

महत्त्वाच्या बातम्या-

IND vs ENG; रिंकू, हर्षितने नाही तर ‘या’ खेळाडूने जिंकला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षणांचे पदक!
IPL 2025; संघाला मोठा धक्का, राॅयल्सचा कर्णधार गंभीर जखमी
भारताच्या शानदार विजयानंतर अमिताभ बच्चनने उडवली इंग्लंडची खिल्ली! व्हायरल पोस्ट एकदा पहाच

Comments are closed.