Ind vs Eng पाचव्या कसोटीदरम्यान अचानक स्टेडियममध्ये रोहित शर्माची एन्ट्री, टीम इंडियाला मिळाले

रोहित शर्मा लंडनला पोहोचला: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेची सुरुवात जशी चुरशीने झाली होती, तसाच थरार शेवटच्या कसोटीतही पाहायला मिळाला. लंडनमधील केनिंग्टन ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या पाचव्या कसोटीतही दोन्ही संघ झुंजताना दिसले. पहिल्या दोन दिवसांत कोणताही संघ सरस वाटत नव्हता. मात्र तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने जोरदार सुरुवात करत सामन्याची पकड मिळवली. याचा साक्षीदार ठरला भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा, जो स्टेडियममध्ये उपस्थित होता आणि आपल्या संघाला पाठिंबा देत होता.

रोहित शर्मा प्रथमच स्टेडियममध्ये दाखल

तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने दुसऱ्या डावात आपली खेळी पुढे सुरू ठेवली. इंग्लंडच्या पहिल्या डावाच्या 23 धावांच्या आघाडीवरून भारताने दुसऱ्या दिवशी 2 गड्यांच्या मोबदल्यात 75 धावा केल्या होत्या. तिसऱ्या दिवशी यशस्वी जैस्वाल आणि नाईट वॉचमन म्हणून आलेल्या आकाश दीपने जबरदस्त फलंदाजी करत धावसंख्या वाढवायला सुरुवात केली. याच दरम्यान रोहित शर्मा केनिंग्टन ओव्हलमध्ये दाखल झाला.

एका व्हिडिओमध्ये रोहित इतर चाहत्यांप्रमाणे आपला तिकीट दाखवत स्टेडियममध्ये प्रवेश करताना दिसला. हा व्हिडिओ काही क्षणात सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि भारतीय चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. मागील काही आठवड्यांपासून रोहित युरोपमध्ये आपल्या कुटुंबासह सुट्ट्यांचा आनंद घेत होता.

टीम इंडियाला मिळाले शुभ संकेत?

रोहित शर्माचे ओव्हल मैदानाशी खास नातं आहे. कारण 2021 च्या इंग्लंड दौऱ्यात ओव्हलवर खेळलेल्या कसोटीत त्याने दुसऱ्या डावात शानदार शतक झळकावले होते आणि भारताला 50 वर्षांनंतर या मैदानावर ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता. त्यामुळे ओव्हलमध्ये रोहितची उपस्थिती म्हणजे भारतीय संघासाठी शुभ संकेत मानले जातात.

तिसऱ्या दिवशी दुपारच्या जेवणापर्यंत, यशस्वी जैस्वाल आणि आकाश दीप यांच्या शतकी भागीदारीमुळे भारताने इंग्लंडवर 166 धावांची आघाडी घेतली आहे. पहिल्या सत्रात आकाश दीपच्या रूपात भारताला तिसरा धक्का बसला. 94 चेंडूत 12 चौकारांसह 66 धावा काढल्यानंतर तो बाद झाला. सध्या यशस्वी जैस्वाल (85) आणि शुभमन गिल (11) क्रीजवर आहेत. दुपारच्या जेवणापर्यंत भारताने तीन विकेटसाठी 189 धावा केल्या आहेत.

हे ही वाचा –

Akash Deep 1st Half Century : अभ्यास केला गिल अन् राहुलचा, पण पेपर आला सिलॅबसच्या बाहेरचा; आकाश दीपने इंग्रजांना रडवले, ठोकले पहिले अर्धशतक

आणखी वाचा

Comments are closed.