टी20 क्रिकेटचा बादशाह रोहित शर्मा! 'हा' रेकाॅर्ड करून रचला इतिहास
आयपीएल 2025चा 50वा सामना चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्स आणि राजस्थान राॅयल्स (MI vs RR) संघात खेळला गेला. या सामन्यात मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) एक खास कामगिरी केली आहे. टी20 क्रिकेटमध्ये एकाच संघासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या बाबतीत त्याने जेम्स विन्सचा विक्रम मोडला.
जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागने (Riyan Parag) टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर रोहित आणि रायन रिकेल्टनच्या जोडीने मुंबईला दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 116 धावा जोडल्या. त्यानंतर 61 धावा करून रिकेल्टन बाद झाला. त्याच वेळी, त्याच्यानंतर रोहित शर्माही 53 धावा करून पॅव्हेलियमध्ये परतला.
रोहित शर्माने राजस्थान रॉयल्सविरुद्ध 36 चेंडूत 9 चौकारांसह 53 धावांची खेळी खेळली. या खेळीच्या जोरावर, रोहित शर्मा आता टी20 क्रिकेटमध्ये एकाच संघासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. रोहितने हॅम्पशायरसाठी 5,934 धावा करणाऱ्या जेम्स विन्सचा विक्रम मोडला आहे. या यादीत सुरेश रैना तिसऱ्या स्थानावर आहे, ज्याने चेन्नई सुपर किंग्जसाठी 5,528 धावा केल्या आहेत, तर एमएस धोनी यादीत पाचव्या स्थानावर आहे, त्याने चेन्नईसाठी 5.269 धावा केल्या आहेत.
या यादीत विराट कोहली (Virat Kohli) अव्वल स्थानावर आहे. कोहलीने आरसीबीसाठी 8,871 धावा केल्या आहेत. रोहित शर्माने मुंबई इंडियन्ससाठी 231 सामन्यांच्या 227 डावांमध्ये 29.82च्या सरासरीने आणि 132.04च्या स्ट्राईक रेटने 6,204 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 39 अर्धशतकांसह 2 शतके झळकावली आहेत. दरम्यान त्याच्या बॅटमधून 548 चौकार आणि 262 षटकार निघाले आहेत.
टी20 मध्ये एका संघासाठी सर्वाधिक धावा-
8,871 – विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)
6,008* – रोहित शर्मा (मुंबई इंडियन्स)
5,934 – जेम्स विंग्स (हॅम्पशायर)
5,528 – सुरेश रैना (चेन्नई सुपर किंग्ज)
5,269 – एमएस धोनी (चेन्नई सुपर किंग्ज)
Comments are closed.