रोहित शर्माने सिडनीत रचला इतिहास! ख्रिस गेलचा रेकॉर्ड मोडत ठरला नंबर-1 खेळाडू
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सुरू असलेल्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेचा शेवटचा सामना 25 ऑक्टोबर रोजी सिडनी येथे खेळला गेला . या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला. सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली (Rohit Sharma & virat kohli) या दोघांनी अप्रतिम कामगिरी केली. अनेक दिवसांनंतर या दोघांनी पुन्हा एकदा शतकी भागीदारी केली. या सामन्यात रोहित शर्माने ख्रिस गेलचा (Khris gayle) विक्रम मोडला आणि एक नवा इतिहास रचला. आता रोहित “नवा सिक्सर किंग” बनला आहे.
रोहित शर्मा आता “सेना देशांमध्ये” म्हणजेच दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया सर्वाधिक षटकार ठोकणारा परदेशी फलंदाज बनला आहे. त्याने या यादीत ख्रिस गेलला मागे टाकले आहे. ख्रिस गेलने या देशांत 87 डावांत 92 षटकार लगावले होते, रोहितने 86 डावांत 93 षटकार ठोकले आहेत.
या यादीत सनथ जयसूर्या तिसऱ्या क्रमांकावर आहेत (89 षटकार), शाहिद आफ्रिदी चौथ्या क्रमांकावर (83 षटकार) आणि विवियन रिचर्ड्स पाचव्या क्रमांकावर (59 षटकार) आहेत.
रोहित शर्माने या सामन्यात 125 चेंडूत 121 धावा केल्या. या दरम्यान त्याने 10 चौकार आणि 3 षटकार मारले. विराट कोहलीने देखील 81 चेंडूत 74 धावा केल्या. त्याने एकूण 8 चौकार ठोकले.
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 46.4 षटकांत 236 धावा केल्या होत्या.
Comments are closed.