रोहित शर्माने मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम! रचला जागतिक इतिहास
टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. नुकत्याच ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत त्याने आपल्या फलंदाजीने धुमाकूळ घातला. मालिकेच्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात रोहितने अफलातून शतक झळकावत एकूण 202 धावा केल्या आणि ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ पुरस्कारही पटकावला.
आता हिटमॅनने क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मोठा विक्रम मोडत नवा इतिहास रचला आहे. रोहित शर्मा आता ICC वनडे रँकिंगमध्ये जगातील नंबर-1 फलंदाज बनला आहे.
भारताला जरी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1-2 ने मालिकेत पराभव पत्करावा लागला, तरी रोहितच्या धडाकेबाज फलंदाजीने चाहत्यांची मने जिंकली.
पहिल्या सामन्यात तो फक्त 8 धावांवर बाद झाला होता, पण दुसऱ्या सामन्यात त्याने 73 धावा करून जोरदार पुनरागमन केले. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात रोहितने 121 धावांचे शतक ठोकून विक्रमांची मालिका रचली.
या अप्रतिम कामगिरीमुळे ICC ने जाहीर केलेल्या ताज्या वनडे रँकिंगमध्ये रोहितने थेट नंबर-1 स्थान पटकावले आहे.
त्याने शुभमन गिलला मागे टाकत अव्वल स्थान मिळवले. यापूर्वी रोहित तिसऱ्या स्थानी होता, पण सलग दोन जबरदस्त खेळींनंतर त्याने दोन पायऱ्या चढत 745 गुणांसह पहिलं स्थान मिळवलं.
रोहित हा असा पराक्रम करणारा पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, विराट कोहली आणि शुभमन गिल यांनीच हा मुकाम गाठला होता.
ICC वनडे रँकिंगमध्ये नंबर-1 बनतानाच रोहित शर्माने आणखी एक इतिहास रचला आहे.
तो आता ICC रँकिंगमध्ये अव्वल स्थान मिळवणारा सर्वात ज्येष्ठ खेळाडू ठरला आहे.
याआधी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. त्यांनी 2011 साली 38 वर्षे आणि 73 दिवसांच्या वयात टेस्ट रँकिंगमध्ये नंबर-1 स्थान मिळवलं होतं.
तर रोहितने हा विक्रम 38 वर्षे आणि 182 दिवसांच्या वयात वनडे रँकिंगमध्ये मिळवत तेंडुलकरला मागे टाकलं आहे.
Comments are closed.