IND vs WI: हिटमॅन शर्माच्या वनडे क्रिकेटमध्ये 12 हजार धावा पूर्ण! ही कामगिरी करणारा जगातील ठरला सातवा फलंदाज

टीम इंडिया आणि वेस्ट इंडीज (Odi series between Team india vs west indies) दोन्ही संघात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्माने (Rohit Sharma) शानदार शतकी खेळी केली. यासोबतच, रोहित शर्मा 12 हजार वनडे धावा करणारा जगातील सातवा फलंदाज ठरला आहे.

वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना गुवाहाटी येथे त्याने हा टप्पा गाठला. वनडे क्रिकेटमध्ये एकूण धावांच्या बाबतीत रोहितच्या पुढे असलेल्या भारतीय फलंदाजांमध्ये फक्त सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar & Virat Kohli) आणि विराट कोहली आहेत.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी शानदार भागीदारी केली. भारतासमोर विजयासाठी 406 धावांचे मोठे लक्ष्य होते. त्यामुळे भारताला वेगवान सुरुवात करण्याची गरज होती आणि दबावही होता. मात्र, दोन्ही फलंदाजांनी दमदार फलंदाजी केली. कर्णधार शुभमन गिलने वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपले 11वे शतक झळकावले.

रोहितनेही या ऐतिहासिक सामन्यात आपले शतक पूर्ण केले. त्याच्या या खेळीने त्याच्या क्षमतेवर आणि तंदुरुस्तीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना चांगलेच उत्तर मिळाले आहे. रोहितने 72 चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. त्यावेळी त्याने 6 षटकार आणि 10 चौकार लगावले होते.

वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 12 हजारांहून अधिक धावा करणारे फलंदाज

18,426 — सचिन तेंडुलकर (भारत)
15080 – विराट कोहली (भारत)
14234 – कुमार संगकारा (श्रीलंका)
13704 — रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया)
13430 — सनथ जयसूर्या (श्रीलंका)
12650 — महेला जयवर्धने (श्रीलंका)
12,000* – रोहित शर्मा (भारत)

39 वर्षीय रोहित शर्माने 2007 मध्ये भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून आतापर्यंत त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. वनडे क्रिकेटमधील सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्येचा विक्रमही त्याच्याच नावावर असून, त्याने श्रीलंकेविरुद्ध 264 धावांची खेळी केली होती.

रोहितच्या नेतृत्वाखाली भारत मागील वनडे विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता. रोहितने 290 वनडे सामन्यांमध्ये 12 हजारांहून अधिक धावा केल्या असून, त्याच्या नावावर 35 शतके आहेत.

रोहित शर्माने कसोटी आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने भारतासाठी 67 कसोटी सामन्यांच्या 116 डावांमध्ये 4301 धावा केल्या आहेत. तर 159 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 151 डावांमध्ये त्याने 4231 धावा केल्या आहेत.

Comments are closed.