रोहित शर्माने दुसऱ्या वनडेत केले 3 मोठे विक्रम, ठरला असं करणारा पहिला आशियाई फलंदाज

रोहित शर्माने अ‍ॅडिलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये 73 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. भारताचे दोन विकेट्स केवळ 17 धावांवर पडल्यावर ही खेळी आली. शुबमन गिल (9) आणि विराट कोहली (0) हे दोघेही एका ओव्हरमध्ये बाद झाले होते. त्यानंतर रोहितने श्रेयस अय्यरसोबत मिळून 118 धावांची भागीदारी केली. रोहित शर्माने 97 चेंडूत 75.26 च्या स्ट्राइक रेटने 73 धावा केल्या. या खेळीत त्याने 2 षटकार आणि 7 चौकार लगावले. या खेळी दरम्यान रोहितने 3 मोठे विक्रम आपल्या नावावर केले.

रोहित शर्माने वनडे क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सौरव गांगुलीला मागे टाकले आहे. आता रोहित या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे, तर गांगुली चौथ्या स्थानावर गेले आहेत. रोहितच्या पुढे फक्त सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली आहेत.

सचिनने भारतासाठी वनडे सामन्यांमध्ये 18,426 धावा केल्या आहेत. ते केवळ भारताचेच नव्हे, तर वनडे क्रिकेटमधील जगातील सर्वाधिक धावा करणारे फलंदाज आहेत. विराट या यादीत दुसऱ्या स्थानावर असून, त्यांच्या खात्यात 14,181 धावा आहेत. मात्र, ऑस्ट्रेलियाचा हा दौरा कोहलीसाठी वाईट स्वप्न ठरला आहे, कारण मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत ते दोन्ही वेळा ‘डक’ म्हणजेच शून्यावर बाद झाले आहेत.

रोहित शर्माने 73 धावांच्या या खेळीत 2 षटकार लगावले, आणि हे दोन्ही षटकार त्यांनी एकााच ओव्हरमध्ये मारले. यासोबतच ते सेना देशांमध्ये (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) 150 षटकार ठोकणारे पहिले आशियाई फलंदाज ठरले आहेत. हे सिद्ध करतं की त्यांना ‘हिटमॅन’ असंच नाही म्हणतात!

रोहित शर्माने फक्त 2 धावा पूर्ण करताच आपल्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला. त्यांनी ऑस्ट्रेलियात, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1000 वनडे धावा पूर्ण केल्या. ऑस्ट्रेलियात 1000 वनडे धावा करणारे इतर भारतीयही आहेत, पण ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1000 वनडे धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज म्हणून रोहित शर्मा इतिहासात नोंदला गेला आहे.

Comments are closed.