IND vs PAK: रोहित शर्माने रचला इतिहास..! महान फलंदाजाला टाकले मागे
सध्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीतील (ICC Champions Trophy 2025) हायव्होल्टेज सामना भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) संघात रंगला आहे. दरम्यान दोन्ही संघ दुबईच्या मैदानावर आमने-सामने आहेत. दरम्यान रोहित शर्माने पाकिस्तानविरुद्ध 20 धावांची खेळी खेळली. पण त्याच्या छोट्याशा डावात त्याने एक मोठा रेकाॅर्ड आपल्या नावावर केला आहे.
रोहितने वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यात सलामीला खेळताना आपल्या 9,000 धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो भारताचा तिसरा आणि जगातील सहावा फलंदाज ठरला आहे.
वनडे सामन्यात सलामीला सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित आता सहाव्या स्थानावर आहे. वनडे सामन्यात सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये सचिन तेंडुलकर (15,310), सनथ जयसूर्या (12,470), ख्रिस गेल (10,179), अॅडम गिलख्रिस्ट (9,200) आणि सौरव गांगुली (9,146) यांचा समावेश आहे. रोहितने आता सलामीला फलंदाजी करताना (9,019) धावा केल्या आहेत.
रोहितने सलामीवीर म्हणून सर्वात कमी डावांमध्ये 9,000 धावा पूर्ण केल्या. रोहितने फक्त 181 डावांमध्ये या 9,000 धावा पूर्ण केल्या. रोहितने सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) रेकाॅर्ड मोडित काढला. वनडे कारकिर्दीत सलामीला येत असताना सचिनने 197व्या डावात 9,000 धावा पूर्ण केल्या.
चॅम्पियन्स ट्रॉफीतील बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात रोहितने वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 11,000 धावा पूर्ण केल्या. त्याने आपल्या 261व्या डावात ही कामगिरी केली. विराट कोहली नंतर अशी कामगिरी करणारा तो दुसरा सर्वात जलद फलंदाज होता.
महत्त्वाच्या बातम्या-
पीएमआरडीए पुरस्कृत महा ओपन एटीपी चॅलेंजर 100 पुरुष टेनिस स्पर्धेत चेक प्रजासत्ताकच्या दलिबोर सेव्हर्सिना याला विजेतेपद
अक्षर पटेलचा सटीक थ्रो! पाकिस्तानच्या फॅन्समध्ये निराशेची लाट, कुणी कपाळ धरले तर कुणी आक्रोश केला!
हार्दिक पांड्याचा विक्रम; भारत-पाकिस्तान सामन्यात चमकदार कामगिरी
Comments are closed.