रोहित शर्माने चाहत्यांना केले निराश! विजय हजारे ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यात मिळाले अपयश

विजय हजारे ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात रोहितने मुंबईसाठी खेळताना 155 धावांची उत्कृष्ट खेळी केली होती. सिक्कीमविरुद्ध त्याने आपल्या बॅटने ताकद दाखवून दिली आणि जयपूरमध्ये हा सामना पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. याच मैदानावर रोहितचा दुसरा सामना होणार होता आणि यावेळी त्याला पाहण्यासाठी चाहत्यांची संख्या दुप्पट होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, उत्तराखंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात रोहितची बॅट चालली नाही आणि तो शून्यावर बाद होऊन माघारी परतला.

रोहित शर्माने चाहत्यांना केले नाराज
विजय हजारे ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यात रोहित शर्मा आपला आवडता पुल शॉट मारण्याच्या नादात झेलबाद झाला. यामुळे त्याची खेळी शून्यावर संपुष्टात आली. ‘हिटमॅन’ बाद झाल्यानंतर चाहते निराश झाले आणि त्यांनी स्टेडियम सोडण्यास सुरुवात केली. प्रामुख्याने रोहितला पाहण्यासाठीच चाहते आले होते, पण तो सुरुवातीलाच बाद झाल्यामुळे संपूर्ण चित्र बदलले. अनेक चाहते स्टेडियम सोडून आपल्या घरी परतले.

Comments are closed.