'आम्ही आमचे सर्वोतपरी…', कॅप्टन रोहित शर्माने घेतला चॅम्पियन्स ट्राॅफी भारतात आणण्याचा निर्धार!
काल (19 जानेवारी) रविवारी, मुंबई क्रिकेट असोसिएशनने वानखेडे स्टेडियमला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एका भव्य समारंभाचे आयोजन केले होते. भारतीय कर्णधार रोहित शर्मा, महान फलंदाज सचिन तेंडुलकर, माजी फलंदाज सुनील गावस्कर, माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि महान फलंदाज अजिंक्य रहाणे यांसारखे स्टार खेळाडू या समारंभात सहभागी झाले होते. यादरम्यान, हिटमन रोहित शर्माने आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
या कार्यक्रमात बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, “आयसीसी स्पर्धेत भारतीय संघाचे कर्णधारपद भुषवणे ही खूप मोठी गोष्ट आहे. यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो. तसेच आगामी चॅम्पियन्स ट्राॅफी भारतात आणण्यासाठी आम्ही आमचे सर्वोतपरी प्रयत्न करु. आमच्या मागे 140 कोटी लोक आहेत, याची जाणीव आणि अभिमान आहे. त्यामुळे आम्हाल जे साध्य करता येईल ते आम्ही नक्कीच करु आणि चॅम्पियन्स ट्राॅफी वानखेडेमध्ये आणू”
कॅप्टन रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल बोलत आहे:
“वानखेडेवर ट्रॉफी परत आणण्यासाठी आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न करू”. [ANI] pic.twitter.com/u2EoYnnHVL
– जॉन्स. (@CricCrazyJohns) 19 जानेवारी 2025
पुढे टी20 विश्वचषकावर बोलताना हिटमॅन म्हणाला, ‘विश्वचषक जिंकणे ही एक गोष्ट आहे आणि आपल्या लोकांसोबत तो साजरा करणे ही दुसरी गोष्ट आहे.’ तुम्ही तुमच्या संघातील सहकाऱ्यांसोबत विजय साजरा करता पण लोकांसोबत हा आनंद साजरा करण्याची भावना मला मुंबईत आल्यानंतर जाणवली. विजयी परेडमध्ये आल्यावर कळाले की, आम्ही खरोखरच विश्वचषक जिंकला आहे. मुंबईने दिलेल्या प्रेमाबद्दल मी नेहमीच ऋणी राहीन”.
चॅम्पियन्स ट्राॅफी 2025 साठी भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा
हेही वाचा-
IPL 2025: LSG लवकरच जाहीर करणार आपला कर्णधार, स्टार खेळाडूचे नाव शर्यतीत सर्वात पुढे
महिलांनंतर, पुरुष संघही विश्वविजेता, पहिल्या खो-खो वर्ल्ड कपवर टीम इंडियाने नाव कोरलं
VIDEO; वानखेडेच्या 50व्या वर्धापनदिनामध्ये रोहित शर्माने जिंकली चाहत्यांची मनं..!
Comments are closed.