अ‍ॅडलेडमध्ये रोहित शर्मा शेवटचा सामना खेळला?, गंभीरचा ‘तो’ VIDEO व्हायरल, नेमकं काय म्हणाला?


रोहित शर्माच्या निवृत्तीवर गौतम गंभीर: रोहित शर्मा निवृत्त होणार का? ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही वनडे मालिका त्याची शेवटची असणार का? रोहित ऑस्ट्रेलियातच आपला फेअरवेल सामना खेळणार का? सध्या प्रत्येक क्रिकेट चाहत्यांच्या मनात हेच प्रश्न घोळत आहेत. पण या सर्व चर्चांमागचं खरं सत्य समोर आलं, तेव्हा लोकांनाही आश्चर्य वाटलं. हे सत्य उघड झालं एका व्हायरल व्हिडिओमधून, ज्यात रोहित शर्मा, टीम इंडिया मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि सध्याचा कर्णधार शुभमन गिल दिसत आहेत.

रोहित शर्मा अन्  गौतम गंभीरचा व्हायरल व्हिडिओ

खरं तर, हा व्हिडिओमुळे रोहित शर्माच्या निवृत्तीबाबतचं रहस्य उलगडले आहे. रोहित शर्मा आत्ता रिटायर होत आहेत का? पण, नंतर याचं उत्तर या व्हिडिओतच दडलं आहे, आणि स्वतः हेड कोच गौतम गंभीर सांगतो. हा व्हिडिओ बहुधा अॅडलेडच्या टीम हॉटेलमधला आहे. सामना संपल्यानंतर भारतीय खेळाडू हॉटेलमध्ये परतताना दिसतात. त्यावेळी लॉबीमध्ये चालताना गंभीर पुढे असलेल्या रोहितला आवाज देतात आणि म्हणतात की, “एक फोटो काढ ना, सगळ्यांना वाटतंय की हा तुझा फेअरवेल सामना होता.” हे ऐकल्यावर रोहित मागे वळून हसताना दिसला. सोबत असलेला कर्णधार शुभमन गिलही ते ऐकून हसतो. (Gautam Gambhir on Rohit Sharma Retirement)


हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एक गोष्ट मात्र स्पष्ट होते की, रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून निवृत्त होत नाहीत. त्याने ज्या फिटनेससह संघात पुनरागमन केलं आणि अॅडलेड वनडेमध्ये ज्या जोमाने खेळला, त्यावरून तो अजून काही काळ टीम इंडियासाठी खेळताना दिसतील, असं स्पष्ट होतं.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने फक्त 8 धावा केल्या. पहिल्या सामन्यानंतर अभिषेक नायरने पुढील दोन सामन्यांमध्ये जोरदार पुनरागमनाची भविष्यवाणी केली होती. रोहित शर्मा नायरच्या अपेक्षांवर खरा उतरला आणि 73 धावांची शानदार खेळी खेळला. त्याच्या खेळीने रोहितने सिद्ध केले की त्याच्यात अजूनही क्रिकेट शिल्लक आहे.

हे ही वाचा –

Virat Kohli News : सिडनीत शेवटचा वनडे खेळणार विराट कोहली?, अश्विनच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण; 3 शब्दांनी उडवून दिली खळबळ

आणखी वाचा

Comments are closed.