रोहित शर्मानं ‘या’ मल्टीबॅगर स्टॉकमधील भागीदारी विकली, 53200 शेअरची विक्री, किती पैसे मिळाले?

रोहित शर्मा नवी दिल्ली: टीम इंडियाच्या वनडे टीमचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) ने दिल्ली येथील आयटी सेवा कंपनी रिलायबल डेटा सर्व्हिसेसमधील  (Reliable Data Services) भागीदारी कमी केली आहे. रोहित शर्मानं त्याच्याकडे असलेल्या भागीदारीपैकी 0.50 टक्के हिस्सा विकला आहे. एक्सचेंजच्या डेटानुसार रोहित शर्मानं कंपनीचे 53200 शेअर 163.91 रुपये प्रति शेअर प्रमाणं विकले आहेत. याचं एकूण मूल्य 87.2 लाख रुपये होतं.

डिसेंबर 2023 च्या शेअर होल्डिंग नुसार रोहित शर्माकडे रिलायबल डेटा सर्व्हिसेसचे 103200 शेअर म्हणजेच  1 टक्के भागीदारी होती. मार्च 2024 मध्ये त्याची भागीदारी 1 टक्क्यांपेक्षा कमी झाली. त्यानंतर त्याचं नाव शेअर होल्डिंगमधून कमी झालं. रियाबल डेटा सर्व्हिसेस हा मल्टीबॅगर स्टॉक असून गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.

कंपनीच्या शेअरमध्ये तेजी

शुक्रवारी सलग सातव्या सत्रात कंपनीच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली.या कंपनीच्या शेअरमध्ये 10 टक्क्यांपर्यंत तेजी पाहायला मिळाली. ट्रेंडलाईन ब्रेकआऊटच्यानंतर चालू आठवड्यात यामध्ये 73.2 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. शुक्रवारी म्हणजे काल देखील या शेअरला अप्पर सर्किट लागलं असून शेअर 163.43 रुपयांवर पोहोचला आहे. या शेअरच्या गुंतवणूकदारांना गेल्या 6 महिन्यात 122 टक्क्यांहून अधिक रिटर्न मिळाले आहेत.  या कंपनीचं बाजारमूल्य 168.66 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक  163.43 रुपये तरी नीचांक 60.10 रुपये इतका आहे.

रिलायबल डेटा सर्व्हिसेसप्रमाणं ॲडवांस्ड एंजाइम टेक्नोलॉजीज (Advanced Enzyme Technologies) चा शेअर देखील चर्चेत आहे. गुरुवारी या स्टॉकमध्ये 7 टक्के तेजी पाहायला मिळाली. शुक्रवारी या स्टॉकमध्ये 6.73 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. हा स्टॉक 346 रुपयांवर पोहोचला.

दुसरीकडे टार्सन्स प्रोडक्ट्सच्या शेअरमध्ये शुक्रवारी 0.4 टक्क्यांची घसरण होऊन ते 311.8 रुपयांवर पोहोचले. सलग 12 व्या सत्रात या स्टॉकमध्ये घसरण पाहायला मिळाली. रिअल इस्टेट फर्म अनंतनाथ स्काईकॉननं टार्सनचे 7.7 लाख शेअर 315 रुपये प्रति शेअर या दरानं खरेदी केले. ही जवळपास 1.44 टक्के भागीदारी आहे.  ट्रू कॅपिटल ने 4,18,617 शेअरची विक्री केली तर कुबेर इंडिया फंड ने कंपनीचे 3.5 लाख शेअर विकले.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.