IND vs SA: रोहित शर्माचा दक्षिण आफ्रिका विरुद्ध सामन्यात मोठा विक्रम! सचिन-कोहलीच्या ‘या’ यादीत झाला समावेश

भारत आणि दक्षिण आफ्रिका (Odi Series IND vs SA) यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज वाइजॅग येथील ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 271 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाचा सलामीवीर आणि माजी कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) शानदार फलंदाजी करत एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. हा विक्रम करणारा तो फक्त चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे.

सलामीवीर रोहित शर्माने तिसऱ्या वनडे सामन्यात जबरदस्त अर्धशतक झळकावले. या सामन्यात ‘हिटमॅन’ने 27 वी धाव घेताच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या 20,000 धावा पूर्ण केल्या. तो अशी कामगिरी करणारा चौथा भारतीय फलंदाज बनला आहे. रोहित शर्माच्या आधी दिग्गज खेळाडू विराट कोहली, राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांनीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20,000 हून अधिक धावा केल्या आहेत. आता रोहितही या खास खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे.

या यादीत विराट कोहलीने 25,000 हून अधिक, तर सचिन तेंडुलकरने 30,000 हून अधिक धावा केल्या आहेत. ‘हिटमॅन’ने आपला सध्याचा उत्कृष्ट फॉर्म या सामन्यातही खास पद्धतीने कायम ठेवला आहे.

रोहित शर्मा 73 चेंडूंमध्ये 75 धावा करून बाद झाला. त्याने 7 चौकार आणि 3 गगनचुंबी षटकार मारले. आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यातही रोहितने शानदार अर्धशतक झळकावले होते.

टीम इंडियाची पुढील वनडे मालिका न्यूझीलंडविरुद्ध जानेवारी 2026 मध्ये होणार आहे. यानंतर भारतीय संघ जवळजवळ 4 ते 5 महिने वनडे क्रिकेट खेळणार नाही. त्यामुळे रोहित त्या मालिकेतही मोठी धावसंख्या करण्याची अपेक्षा करेल.

Comments are closed.