“काय रे हिरो, आता येतोयस…” MI vs LSG सामन्यापूर्वी रोहितने उडवली शार्दुलची खिल्ली! पहा व्हिडिओ

सध्या आयपीएलचा 18वा हंगाम (IPL 2025) सुरू आहे. दरम्यान आयपीएलच्या सुरूवातील मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा खराब फाॅर्मशी झुंजत होता. पण शेवटच्या 2 सामन्यात तो चांगल्या लयीत दिसला. रोहितने सलग 2 अर्धशतके झळकावली आहेत. तत्पूर्वी रोहित शर्मा मैदानात असो वा बाहेर, त्याची मजेदार शैली सर्वत्र दिसते, जी चाहत्यांनाही खूप आवडते. आयपीएल
2025 मध्ये, हिटमॅनच्या अनेक मजेदार संवादांचे व्हिडिओ चर्चेत आहेत. दरम्यान, रोहितचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो शार्दुल ठाकूरवर मजेदार पद्धतीने टीका करताना दिसत आहे.

मुंबई इंडियन्स या स्पर्धेतील त्यांचा पुढचा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध (27 एप्रिल) रोजी दुपारी 3.30 वाजता खेळला जाणार आहे. दोन्ही संघ या सामन्याची तयारी करण्यात व्यस्त आहेत. सराव सत्रादरम्यान, हिटमॅन शार्दुल ठाकूरची मस्करी करताना दिसला. खरं तर, सामन्यापूर्वीच्या सराव सत्रादरम्यान, रोहित शर्मा एलएसजी मेंटाॅर झहीर खानच्या शेजारी बसलेला दिसला. त्याच वेळी, शार्दुल ठाकूर आत आला आणि रोहितने सरावासाठी उशिरा आल्याबद्दल त्याची खिल्ली उडवली.

शार्दुलला पाहून रोहित म्हणाला, “काय रे हिरो, आता येत आहेस. घरचा संघ आहे का?”

मुंबई इंडियन्सने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, ‘जेव्हा बोरिवली वाला पालघर वालाशी भेटतो.’

मुंबई इंडियन्सने त्यांच्या शेवटच्या चारही सामन्यात विजय मिळवला. आता लखनऊविरूद्धचा हा सामना जिंकण्यासाठी त्यांना एक मजबूत दावेदार मानले जाते. दुसरीकडे, एलएसजीने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा शेवटचा सामना 8 विकेट्सने गमावला आणि या सामन्यात पुनरागमन करण्यासाठी उत्सुक असेल.

स्पर्धेच्या सुरुवातीला, मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) त्याच्या खराब फॉर्मशी झुंजताना दिसला. पण आता त्याने पुन्हा लय मिळवली आहे. चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात, त्याने आपली दमदार कामगिरी दाखवत 45 चेंडूत 76 धावांची शानदार खेळी खेळली. त्याच वेळी, हैदराबादविरूद्धच्या सामन्यात, रोहितने गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. त्याने 46 चेंडूत 70 धावांची सामना जिंकणारी खेळी खेळली.

Comments are closed.