वनडेचा राजा रोहित शर्मा…; ICC क्रमवारीत नंबर 1 स्थान पटकावले, आतापर्यंतचा सगळ्यात मोठा रेकॉर्
रोहित शर्मा आयसीसी एकदिवसीय क्रमवारी: ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेतील प्रभावी कामगिरीनंतर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले (Rohit Sharma No 1 Ranked ODI Batter ICC Rankings) आहे. विशेष म्हणजे सध्याचा भारतीय संघाचा एकदिवसीय कर्णधार शुभमन गिलला (Shubhman Gill) मागे टाकून रोहित शर्माने पहिले स्थान मिळवले आहे. तसेच आता रोहित शर्मा जगातील नंबर वन वनडे फलंदाज बनणारा सर्वात वयस्कर खेळाडू बनला आहे. ताज्या एकदिवसीय क्रमवारीत, रोहित शर्माने शुभमन गिल आणि अफगाणिस्तानचा इब्राहिम झदरानला मागे टाकत 781 रेटिंग गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. दुसरीकडे, शुभमन गिल पहिल्या क्रमांकावरुन थेट तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे.
रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत (Ind vs Aus) इतर सर्व फलंदाजांना मागे टाकत सर्वाधिक धावा केल्या. पहिल्या सामन्यात रोहित शर्माची फलंदाजी कामगिरी खराब होती. परंतु त्याने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अर्धशतक झळकावले आणि शेवटच्या सामन्यात शतक झळकावून संघाला विजय मिळवून दिला. रोहित शर्माने (Rohit Sharma) ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेत 101 च्या सरासरीने 202 धावा केल्या. याच कमागिरीचा रोहित शर्माला फायदा झाला. रोहित शर्मा त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे.
३८ वर्षांचा रोहित शर्मा प्रथमच वनडे क्रिकेटमध्ये प्रथम क्रमांकाचा फलंदाज बनला आहे. 🤯
– वयाच्या ३८ व्या वर्षी शिखर गाठण्याची कल्पना करा. 🫡 pic.twitter.com/jgjXyB2hqb
— मुफद्दल वोहरा (@mufaddal_vohra) 29 ऑक्टोबर 2025
अव्वल स्थान पटकावणारा रोहित शर्मा पाचवा भारतीय- (Rohit Sharma No 1 Ranked ODI Batter ICC Rankings)
आयसीसी एकदिवसीय फलंदाजाच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारा रोहित शर्मा पाचवा भारतीय फलंदाज ठरला आहे. सचिन तेंडुलकरने पहिल्यांदा आयसीसी एकदिवसीय फलंदाजाच्या क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले होते. त्यानंतर एमएस धोनीनेही अव्वल स्थान पटकावले होते. विराट कोहलीने बराच काळ एकदिवसीय फलंदाजाच्या क्रमवारीत अव्वल स्थान राखून ठेवले होते. त्यानंतर शुभमन गिलने खूप कमी वेळात अव्वल स्थान पटकावले. आता रोहित शर्माने शुभमन गिलला मागे टाकत बाजी मारली आहे.
आता दक्षिण अफ्रिकेविरुद्ध रोहित शर्मा मैदानात उतरणार- (Ind vs SA ODI)
ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका संपली आहे. त्यामुळे आता रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) पुन्हा मैदानात कधी दिसणार, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली, जवळजवळ टीम इंडियासाठी खेळत आहेत. विराट कोहली आणि रोहित शर्माने कसोटी आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे आणि आता ते फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळत आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर, टीम इंडियाची पुढील एकदिवसीय मालिका दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (India vs South Africa) असेल.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.